बार्बाडोस : भारताचा वेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यात (India Vs West Indies) कसोटी (Test) मालिका भारताने जिंकल्यानतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना (India Vs West Indies) (गुरुवारी २७ जुलैला) पार पडला. यात भारताने विजयी सलामी दिली. सुरु होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्या कॅप्टन्सीत वेस्ट इंडिज टीम मैदानात उतरेल. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सने जिंकला. विंडिजने विजयासाठी दिलेलं 115 धावांचं आव्हान टीम इंडियाने 22.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरा सामना (शनिवारी 29 जुलै) आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. (One day Series)
भारतीय संघात बदल होणार?
पहिल्या सामन्यात रोहित शर्माकडून या सामन्यात एकामागून एक चुका होत राहिल्या. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित आपल्या चुका सुधारण्यावर भर देणार आहे. दुसऱ्या वनडेत आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. रोहित शर्माने जर दुसऱ्या वनडेत चुका सुधारल्या तर भारताला वनडे मालिका विजही मिळवता येऊ शकतो. फलंदाजी क्रमवारीत काही बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय संघात चार अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. इशान किशन आणि संजू सॅमसन यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्पर्धा करत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघात पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळं त्याच्यात काही बदल होऊल असं वाटत नाही.
अजूनपर्यंत भारत-वेस्ट इंडिज यांच्यात भारी कोण?
आजचा सामना केंसिंग्टन ओव्हल बार्बाडोस इथे होणार आहे. इतिहास पाहता, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 140 सामने झालेत. यामध्ये आकडेवारीच्या दृष्टीने टीम इंडियाची बाजू मजबूत आहे. टीम इंडियाने 140 पैकी 71 सामन्यात विंडिजवर विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजने 63 वेळा टीम इंडियावर विजय मिळवला आहे. 2 सामने हे टाय झाले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळं आज टिम इंडियाचे या सामन्यात पारडे जड असल्याचं बोललं जातंय.
सामना कुठे पाहता येणार?
दरम्यान, सामना मोबाईलवर फॅन कोड आणि जिओ सिनेमा या एपवरही मॅच लाईव्ह पाहता येईल. तसेच विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वनडे सीरिजमधील सर्व सामने हे टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील.
संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार
संभाव्य वेस्ट इंडिज संघ
शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.