भारताबाहेरही फुलले कमळ! ब्रिक्स प्रेसिडेन्सीचा लोगो, थीम आणि वेबसाइट लाँच, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले काय आहे विशेष ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
BRICS India Presidency 2026 logo : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ (BRICS) या शक्तिशाली देशांच्या समूहाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठीची अधिकृत वेबसाइट (brics2026.gov.in) आणि लोगोचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताचा दृष्टिकोन ‘मानवता प्रथम’ (Humanity First) आणि ‘लोककेंद्रित’ (People-centric) असल्याचे स्पष्ट केले.
ब्रिक्स २०२६ चा लोगो हा केवळ एक चिन्ह नसून तो भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि जागतिक ऐक्याचा संदेश आहे. या लोगोची रचना भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या ‘कमळा’ वर आधारित आहे. लोगोच्या मध्यभागी ‘नमस्ते’ ही मुद्रा आहे, जी स्वागत आणि आदराचे प्रतीक आहे. लोगोच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्सच्या सर्व सदस्य देशांच्या ध्वजांचे रंग समाविष्ट करण्यात आले आहेत, जे ‘विविधतेत एकता’ दर्शवतात. जयशंकर यांच्या मते, हा लोगो परंपरा आणि आधुनिकतेचे अचूक मिश्रण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव
परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या भाषणात भारताच्या अध्यक्षपदाची चार मुख्य उद्दिष्टे मांडली: १. लवचिकता (Resilience): जागतिक धक्क्यांना तोंड देऊ शकतील अशा संस्थात्मक क्षमता निर्माण करणे. २. नवोन्मेष (Innovation): सामाजिक-आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा, विशेषतः ‘स्टार्ट-अप’ आणि ‘MSME’ क्षेत्राचा वापर करणे. ३. सहकार्य (Cooperation): सदस्य देशांमध्ये राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर समन्वय वाढवणे. ४. शाश्वतता (Sustainability): पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा आणि हरित इंधनावर भर देणे.
India unveiled the BRICS 2026 logo, symbolising unity and shared growth. A lotus at the heart represents resilience and harmony, while petals in the colours of every BRICS nation reflect diversity and equality. The central “Namaste” conveys dialogue, respect, and inclusivity at… pic.twitter.com/MZu3IGmgUV — MyGovIndia (@mygovindia) January 14, 2026
credit – social media and Twitter
योगायोगाने, २०२६ मध्ये ब्रिक्स समूहाच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन दशकांत हा समूह उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक मोठा आवाज म्हणून पुढे आला आहे. जयशंकर यांनी सांगितले की, भारत या संधीचा उपयोग ‘ग्लोबल साउथ’ (Global South) म्हणजेच विकसनशील देशांच्या समस्या जगासमोर मांडण्यासाठी करेल. यामध्ये संयुक्त राष्ट्रे (UN), जागतिक बँक आणि IMF सारख्या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा भारताचा आग्रह असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Senate: पुरुष अन् गर्भधारणा? डॉ. निशा वर्मांच्या उत्तराने विज्ञान विश्व थक्क; अमेरिकन सिनेटमधील ‘त्या’ वादाचा VIDEO VIRAL
नव्याने लाँच करण्यात आलेली वेबसाइट brics2026.gov.in हे बैठका, उपक्रम आणि करारांची माहिती देणारे मुख्य माध्यम असेल. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि जगाला भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात होणाऱ्या हालचालींची वेळेवर माहिती मिळेल. भारताच्या या नेतृत्वाखाली सांस्कृतिक देवाणघेवाण, शिक्षण आणि पर्यटनालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
Ans: हा लोगो भारताचे राष्ट्रीय फूल 'कमळ' आणि 'नमस्ते' या मुद्रेवर आधारित असून यात सदस्य देशांचे रंग समाविष्ट आहेत.
Ans: "Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability" ही या वर्षीची मुख्य थीम आहे.
Ans: मूळ ५ देशांव्यतिरिक्त (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका), इराण, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया आणि यूएई हे देश आता पूर्णवेळ सदस्य आहेत.






