मुंबई : कतार येथे आज फिफा विश्वचषकासाठी अंतिम लढत होणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात आज अंतिम सामना रंगणार असून यापैकी कोण विश्वचषकावर नाव कोरणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. अशातच बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)याने त्याचा आवडता फुटबॉल संघ कोणता आणि तो अंतिम सामन्यात कोणाला सपोर्ट करतोय याविषयी सांगितले आहे.
जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असणारा फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी सर्वच उत्साहित आहेत. शाहरुख खान देखील फुटबॉलचा मोठा चाहते आहे. नुकतेच शाहरुखने #AskSRK चा ट्रेंड सुरू केला होता. यात चाहत्यांच्या प्रश्नांना शाहरुख उत्तर देत होता. दरम्यान, एका चाहत्याने फिफा वर्ल्ड कपशी संबंधित प्रश्न विचारला. त्याने विचारले, ‘वर्ल्ड कप फायनलमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात?’ याला उत्तर देताना शाहरुखने लिहिले, ‘अरे यार, मन सांगतंय की मेस्सी? पण एमबाप्पेचा खेळही पाहण्यासारखा आहे.
Screen shot Lelo bhai aap lucky ho ?
— इश्क में हारा हुआ परिंदा (@MemHara) December 17, 2022
प्रश्नोत्तरादरम्यान एका यूजरने शाहरुखला विचारले की, पोर्तुगाल संघाचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो लिओनेल मेस्सीपेक्षा सरस का? याला शाहरुखनेही आपल्या शैलीत उत्तर दिले. किंग खान म्हणाला, ‘एक सल्ला देतो कि सर्वोत्कृष्ट काय याच्या शोधात राहू नका… यामुळे चांगल्या गोष्टीचाही नाश होतो.’
आज रविवारी १८ डिसेंबर रोजी फिफा विश्वचषकात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.