भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना पार पडत आहे. रांची येथील स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार टेम्बा आज संघात नसून केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत घेतलेल्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा अधिकतर नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतो. मात्र \ आजची विकेट फलंदाजीसाठी चांगली दिसत असल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ९ धावांनी गमावला होता. पावसामुळे त्यादिवशीचा सामना हा ४० षटकांचा खेळवण्यात आला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधू शकतो.