फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हेनरिक क्लासेन : सध्या दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका सुरु आहे. या दोन्ही संघामध्ये तीन सामान्यांची मालिका होणार आहे, या मालिकेचे दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. शेवटचा सामना 22 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. याच सामान्यादरम्यान आता एक घटना घडली आहे या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
आयपीएलमध्ये आपल्या बॅटने गोलंदाजांसाठी भीतीचे नाव बनलेला दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज हेनरिक क्लासेन सध्या अडचणीत सापडला आहे. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या खेळाडूला दंड ठोठावण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 81 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात क्लासेनचे शतक हुकले होते. त्याने 97 धावा केल्या होत्या.त्यानंतर तो बाद झाला आणि त्याने रागाच्या भरात स्टंपला लाथ मारली.
South Africa batter Heinrich Klaasen has been fined 15% of his match fee and received one demerit point for kicking the stumps at the end of the second ODI against Pakistan 🇿🇦🇵🇰🤯🤯 #SAvPAK pic.twitter.com/SSg4cm2CDa
— Pro Cricket (@ProCricketPK) December 20, 2024
त्यामुळे क्लासेनला त्याच्या या कृत्यामुळे मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ICC आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल तो दोषी ठरला आहे. याशिवाय क्लासेनला बोर्डाच्या अनुच्छेद 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल देखील दोषी ठरवण्यात आले आहे, ज्यामुळे त्याला क्रिकेट उपकरणे, कपडे आणि मैदानावरील उपकरणांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा एक डिमिटर पॉइंट मिळाला आहे. क्लासेन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा रिटेन केलेला खेळाडू आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादने 23 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 43 वे षटक सुरू होते. याच षटकात क्लासेन बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. या कारणामुळे त्याने रागाच्या भरात स्टंपला लाथ मारली. यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी क्लासेनवर दंड ठोठावला. आता क्लासेनला त्याच्या खिशात खोलवर जावे लागेल. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर 330 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 248 धावांत सर्वबाद झाला. क्लासेनच्या रूपाने संघाने शेवटची विकेट गमावली होती. क्लासेनने 74 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या होत्या.
या सामन्यात क्लासेनचा पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि कर्णधार मोहम्मद रिझवानसोबत वादही झाला होता. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. पंचांनी दोघांना वेगळे केले होते. हा सामना जिंकून पाकिस्तानने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. आता तिसरा सामना दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला आपली मान वाचवायची आहे. त्याच वेळी, क्लासेन अधिक सावध असेल कारण त्याने आता काही केले तर प्रकरण निलंबनापर्यंत पोहोचू शकते. दक्षिण आफ्रिका पाकिस्तानकडून 0-3 ने पराभूत होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.