फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
सूर्यकुमार यादव – आर अश्विन : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. संपूर्ण मालिकेत अनेक तरुण खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ही मालिका दुःस्वप्न ठरली कारण त्याला कोणत्याही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्याच्या कामगिरीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील काही सामान्यांपासून सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून फार काही धावा आल्या नाहीत.
इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये तो कॅप्टन सूर्या पूर्णपणे फ्लॉप ठरला. करता पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने फक्त २८ धावा केल्या, ज्यामध्ये दोन अपयशांचा समावेश आहे. त्याच्या कामगिरीनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनने त्याला फॉर्ममध्ये परतण्याचा सल्ला दिला आहे. आर अश्विन याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेदरम्यान अचानक निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट प्रेमींना धक्का दिला. रवी अश्विनला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध अशाच परिस्थितीत बाद होताना पाहून आश्चर्य वाटले. त्याने असा दावा केला की तो त्याच पद्धतीने बाद झाला आणि त्याच चुका केल्या, जो संघासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे.
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, ‘तथापि, सूर्यकुमारची फलंदाजी हीच समस्या आहे. अर्थातच या मालिकेत त्याचे कर्णधारपद खरोखरच चांगले राहिले आहे. त्याची कर्णधारपदीही उत्तम कामगिरी झाली आहे. पण तो त्याच्या फलंदाजीला काही काळ विश्रांती देऊ शकतो. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव एकाच चेंडूवर, त्याच मैदानावर, त्याच शॉटवर, त्याच चुकीवर आणि त्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा बाद होत आहेत.
अश्विनने असा दावा केला आहे की, खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात चांगली कामगिरी करण्यासाठी सूर्यकुमारला त्याच्या फलंदाजीच्या शैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत त्याच्या बॅटमधून काढलेली सर्वात मोठी खेळी १४ धावांची होती. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील माजी नंबर वन फलंदाजाकडून भारताला खूप अपेक्षा होत्या, पण तो अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्याचे कर्णधारपद चांगले राहिले आहे, पण त्याची फलंदाजी चांगली राहिलेली नाही. सलामीवीर संजू सॅमसनलाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे.
सातत्याने सुरु असलेल्या सूर्यकुमार यादवच्या खराब कामगिरीमुळे त्याला चॅम्पियन ट्रॉफीमधून देखील वगळण्यात आले आहे. पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्याला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी तो म्हणाला होता की, खराब फॉर्ममुळे मला संघामध्ये स्थान मिळाले नाही. भारताचा संघ आगामी मालिका इंग्लडविरुद्ध एकदिवसीय टीम सामान्यांची मालिका खेळणार आहे, या मालिकेचा पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.