फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
SRH vs DC Match Update : सनरायझर्स हैदराबादचा राजीव गांधी मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना सुरु होता. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ या सीझनमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कमालीचा खेळ दाखवला होता. हैदराबादच्या संघाने आज दिल्लीच्या संघाला १३३ धावांवर गुंडाळले होते. या सामन्याचा पहिला डाव होता त्यांनंतर आता हैदरबादमध्ये राजीव गांधी मैदानावर मुसळधार पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि स्टार स्पोर्ट्सवर यासंदर्भात पुष्टी करण्यात आली आहे.
या सीझनमध्ये हैदराबादच्या संघाने चांगली कामगिरी केली नाही पण आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि पॉवर प्लेमध्ये ३ विकेट मिळवून दिले. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट गमावून १३३ चं धावा करू शकली. पहिल्या डावाचा खेळ झाल्यानंतर मैदानावर पाऊस कोसळला लागला आणि त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे. जर सामना झाला नाही तर दोन्ही संघाला १-१ गुण दिला जाईल.
🚨 News 🚨
Start of the second innings of #SRHvDC has been delayed due to rain.
Stay tuned for further updates.#TATAIPL pic.twitter.com/liPLMLpWpz
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
इंडियन प्रीमियर लीगमध्ये पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा पॅट कमिन्स पहिला कर्णधार ठरला आहे. कमिन्सपूर्वी कोणत्याही कर्णधाराला पहिल्या सहा षटकांत तीन विकेट घेता आल्या नाहीत. आयपीएलच्या या हंगामात अक्षर पटेलने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स घेतल्या. कमिन्सने पहिल्या सहा षटकांत दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांवर कहर केला. हैदराबादच्या कर्णधाराने करुण नायरला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, फाफ आणि अभिषेक पोरेल यांनीही कमिन्ससमोर शरणागती पत्करली. कमिन्सने शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १९ धावा देत ३ बळी घेतले. तीन विकेट्स घेण्याव्यतिरिक्त, कमिन्स खूपच किफायतशीर होता.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीचा क्रम खूपच खराब झाला. करुण नायर खाते न उघडताच बाद झाला, तर फाफ डू प्लेसिस फक्त ३ धावा करून बाद झाला. अभिषेकही १० चेंडूंचा सामना करून आणि फक्त ८ धावा करून बाद झाला. केएल राहुलही फ्लॉप झाला आणि १० धावा काढून जयदेव उनाडकटचा बळी ठरला. कर्णधार अक्षर पटेलची बॅटही शांत राहिली आणि तो फक्त ६ धावा करू शकला. शेवटच्या षटकांमध्ये, ट्रिस्टन स्टब्सने ३६ चेंडूत ४१ धावा फटकावल्या तर आशुतोष शर्माने २६ चेंडूत ४१ धावा फटकावल्या आणि दिल्लीला १३३ धावांपर्यंत पोहोचवले.