फोटो सौजन्य - IndianPremierLeague
SRH vs DC : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामन्याचा पहिला डाव झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. तर आजच्या सामन्याचे हिरो हे सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाज राहिले आहेत. आजच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या दिशेने नाणेफेक झाले. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय त्याच्या फायद्यात आला आहे. आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादसमोर ११० धावा केल्या आहेत. त्यामुळे आता हैदराबादसमोर १३४ धावांचे लक्ष्य असणार आहे.
आजच्या सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने ४ विकेट पहिल्या ६ ओव्हरमध्ये गमावले आणि खेळ पूर्णपणे सनरायझर्स हैदराबादच्या दिशेने वळला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या फलंदाजीबद्दलस सांगायचे झाले तर दिल्लीच्या संघाने १० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून फक्त ४७ धावा केल्या होत्या. पहिल्या पाच फलंदाजांनी एकानेही १० चा आकडा पार केला नाही. केएल राहुलने संघासाठी फक्त १० धावा केल्या आणि विकेट गमावली. त्यानंतर संघाचे पाच फलंदाज बाद झाल्यानंतर विप्राज निगम आणि ट्रिस्टन स्टब्स हे फलंदाजी करत होते यावेळी स्टब्सच्या चुकीमुळे विप्राज निगम धावबाद झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. विप्राज निगम याने संघासाठी १७ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या.
सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या फलंदाजाची CSK मध्ये झाली एंट्री! धोनीने सर्वांना केलं आश्चर्यचकित
दिल्ली कॅपिटल्सचा संघ जेव्हा अडचणींमध्ये होता तेव्हा संघाने इम्पॅक्ट प्लेयरचा उपयोग केला आणि आशुतोष शर्माला फलंदाजीसाठी पाठवले. आजच्या सामन्यात आशुतोष शर्माने संघासाठी २६ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. ट्रिस्टन स्टब्स याने आजच्या सामन्यात नाबाद खेळी खेळली आणि संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स याने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये त्याने ४ चौकार मारले.
करुण नायर – ० (१)
फाफ डूप्लेसी – ३ (८)
अभिषेक पोरेल – ८ (१०)
केएल राहूल – १० (१४)
अक्षर पटेल – ६ (७)
Innings Break!
A dominant bowling effort from #SRH led by Pat Cummins restricts #DC to 1⃣3⃣3⃣
Updates ▶ https://t.co/1MkIwk4VNE#TATAIPL | #SRHvDC | @SunRisers pic.twitter.com/JFGWH7AhjD
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने संघासाठी पहिल्याच चेंडूवर त्याने करुण नायरला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आजच्या सामन्यात पॅट कमिन्सने संघासाठी ३ विकेट्स घेतले यामध्ये त्याने करुण नायर, फाफ डूप्लेसी आणि अभिषेक पोरेल यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जयदेव उनादकट आणि हर्षल पटेल या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. हर्षल पटेलने अक्षर पटेलला बाहेरचा रस्ता दाखवला तर केएल राहुलला जयदेव उनादकटने आऊट केले.