SRH Vs DC Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
इशान किशन आणि अक्षर पटेल आमनेसामने
हैदराबादमध्ये धावांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 SRH Vs DC Live Updates: आज संध्याकाळी 7.30 वाजता एसआरएच विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ विजय (IPL 2026) मिळवण्याचा प्रयत्न करतील. हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आज दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असेल याबाबत जाणून घेऊयात.
सध्या एसआरएचचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 4 थ्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 5 व्या स्थानी आहे. एसआरएचने 6 पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने पाच पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
IPL 2026 चा पॉवर प्ले म्हणजे ‘सिक्सर’चा कारखाना; अभिषेक, वैभवसह ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान
हेड टू हेड रेकॉर्ड?
आजच्या सामन्यात जोरदार लढत पाहायला मिळू शकते. हेड टू हेड रेकॉर्डबद्दल विचार केल्यास एसआरएचने दिल्लीला आतापर्यंत 13 वेळा पराभूत केले आहे. तर, दिल्लीने एसआरएचने 12 वेळेस पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे पारडे आज मजबूत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने आज चाहत्यांना रोमांचक सामन्याची पर्वणीच मिळणार आहे.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
हैदराबादची खेळपट्टी काळ्या मातीची असून, हे हाय स्कोअरिंग पीच आहे. या ठिकाणी स्कोअर 180 आणि 200 पर्यंत होतो. पीच हार्ड, सुखे आहे. त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजांना बाऊन्स मिळतो. सुरुवातीचे काही ओव्हर्स फलंदाजांना हे पीच चांगली मदत करते. अचूक लाइनवर फलंदाजी होत असल्यास पॉवर प्ले मध्ये मोठी धावसंख्या केली जाऊ शकते. हे पीच फलंदाजीसाठी चांगले असल्याने टॉस जिंकून कर्णधार चेस करण्याचा निर्णय घेताना दिसून येतात.
SRH Vs DC Pitch Report: हैद्राबादमध्ये धावांचा डोंगर की…; काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
आतापर्यंत हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे 86 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 37 सामने जिंकले गेले आहेत. तर चेस करताना 48 सामने जिंकले गेले आहेत. टॉस जिंकून या ठिकाणी 32 सामने जिंकले गेले आहेत. तर टॉस हरल्यानंतर या ठिकाणी 53 सामने खेळवले गेले आहेत.
एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, ईशान मलिंगा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.






