फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Toss Update : आज आयपीएल २०२५ चा १९ वा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय. हा सामना हैदराबादच्या होमग्राऊंवर होणार आहे, त्यामुळे आज हैदराबादचा संघ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. आजचा सामना सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर आजच्या सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. मागील सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने कमालीची कामगिरी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते.
दोन्ही संघाच्या मागील कामगिरीवर नजर टाकली तर हैदराबादच्या संघाला मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यांमध्ये त्यांनी राजस्थानच्या संघाला पराभूत करून दमदार सुरुवात केली होती, पण त्यानंतर त्यांनी पुढील तीनही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या संघाचा दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट राइडर्सने पराभव केला आहे. हैदराबादचा संघ कागदावर खूपच मजबूत दिसत होता पण मागील तीन सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. पॉईंट टेबलवर हैदराबादचा संघ दहाव्या स्थानावर आहे.
🚨 Toss 🚨@gujarat_titans won the toss and opted to bowl first against @SunRisers
Updates ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#TATAIPL | #SRHvGT pic.twitter.com/NSQEVcAiRt
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
गुजरात टायटन्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर गुजरातच्या संघाने पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध गमावला होता. त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये गुजरातच्या संघाने ५ वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभूत केले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले.
आजच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे या संघात प्लेइंग ११ मध्ये वॉशिंग्टन सुंदरला संघामध्ये स्थान मिळाले आहे तर हैदराबादच्या संघामध्ये जयदेव उनाडकटला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकिपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.
प्रभावशाली खेळाडू: शेरफेन रदरफोर्ड
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, जीशान अन्सारी, जयदेव उनाडकट
प्रभावशाली खेळाडू: अभिनव मनोहर