Tilak Verma Century (फोटो- ians)
मुंबई इंडियन्सचा गुजरातवर 101 रन्सने विजय
तिलक वर्माने लगावले शानदार शतक
माहेला जयवर्धने केले मोठे भाष्य
Tata IPL 2026 MI Vs GT Updates: काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. अखेर सलग 4 पराभव झालयावर मुंबई इंडियन्सने आयपीएलमधला दुसरा विजय मिळवला आहे. गुजरातवर मुंबईने 101 रन्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने शानदार शतक केले आहे. तिलक वर्माने केलेल्या शतकावर माहेला जयवर्धनेने भाष्य केले आहे.
काय म्हणाले माहेला जयवर्धने?
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये महेला जयवर्धने म्हणाले, “आम्ही सुरुवातीला अडचणीत होतो, पण आम्ही त्यातून स्वतःला सावरले. आम्ही संयम राखला आणि 199 /5 ही धावसंख्या उभारण्यासाठी अतिशय दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्माचे कौतुक करताना जयवर्धने म्हणाले, “आम्ही काही ओव्हर्समध्ये मोठी धावसंख्या उभी केली. मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली आहेत, त्यापैकी तिलकची खेळी सर्वोत्तम आहे.”
Batting ➕ Bowling ➕ Fielding 🟰A complete team effort 💙 pic.twitter.com/NmX3Pn4gX6 — Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2026
Tilak Verma ने गुजरात टायटन्सला रडवत मारले शतक
सोमवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तिलक वर्माने आयपीएलच्या इतिहासात क्वचितच घडणारी एक कामगिरी केली. त्याने केवळ आपले पहिले शतकच झळकावले नाही, तर गंभीर दुखापत असूनही आपली जागा टिकवून ठेवली आणि आपल्या संघाला एका संस्मरणीय विजयाकडे नेले. मुंबई इंडियन्सच्या डावातील १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूने सर्वांचा श्वास रोखून धरला. गुजरात टायटन्सचा गोलंदाज अशोक शर्माने १५०.३ किमी प्रतितास वेगाने एक धोकादायक बाउन्सर टाकला. तिलक वर्माने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग चुकला आणि तो थेट त्याच्या कमरेला लागला. वेदनेने विव्हळत तिलक वर्मा तात्काळ जमिनीवर कोसळला. व्हिडिओमध्ये त्याची वेदना स्पष्टपणे दिसत होती आणि गुजरात टायटन्सचे खेळाडू त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्याभोवती जमले.
तिलक आता फलंदाजी करू शकणार नाही असे सर्वांना वाटले होते, पण या तरुण खेळाडूने हार मानण्यास नकार दिला. वेदना होत असूनही तो खेळत राहिला आणि अवघ्या ४५ चेंडूंमध्ये त्याने आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. या खेळीसह, त्याने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद शतक करण्याचा सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली.






