भारताचा श्रीलंकेवर विजय (फोटो - ani)
1. भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध फायनल खेळणार
2. आशिया कप स्पर्धेतील होता अखेरचा साखळी सामना
3. भारताने केली प्रथम फलंदाजी
4. स्पर्धेतील भारताचा पहिला पराभव
Asia Cup Live 2025: आज २६ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मधील सुपर ४ सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना पार पडला. आज आशिया कपमधील शेवटचा साखळी सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आशिया कपमध्ये शेवटच्या सामन्यात सुपर ओव्हरचा खेळ झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 202 धावा केल्या. श्रीलंकेने जोरदार सुरुवात केली. मात्र सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत गेला. तिथेच सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात श्रीलंकेने केवळ 3 धावा केल्या. ते आव्हान भारताने 1 ल्याच चेंडूत पार पाडले आणि विजय प्राप्त केला.
भारताने सलग 6 वा विजय मिळवला आहे.
श्रीलंकेने फलंदाजीला जोरदार सुरुवात केली. पाथूम निसांकाचे सतक आणि कुशल परेरा याचे अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 202 धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या ओव्हरमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना हा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये श्रीलंका केवळ 3 च धावा करू शकली. भारताने हे अव्हा एका चेंडूतच पूर्ण केले
IND vs SL : भारताचे श्रीलंकेसमोर 203 धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्माची अर्धशतकांची हैट्रिक
भारताने केली प्रथम फलंदाजी
भारताने अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरवार प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून २०२ धावा केल्या. भारताची सुरवात मात्र खराब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताला गिलच्या रूपात पहिला झटका बसला. गिल कॉट अँड बोल्ड झाला. त्याला महेश तिक्षानाने बाद केले. त्यानंतर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादव या सामन्यात देखील अपयशी ठरला आणि तो १३ चेंडूत १२ धावा काढून बाद झाला. त्याला वानिंदू हसरंगाने माघारी पाठवले. त्यानंतर अभिषेक शर्माने या स्पर्धेत सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक करून शर्मा माघारी गेला. त्याने ३१ चेंडूचा सामना करत ६१ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याला चारिथ असलंकाने बाद केले.
IND vs SL : श्रीलंका स्पर्धेचा शेवट गोड करणार; TOSS जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय