श्रीलंका आणि भारत(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आज आशिया कप २०२५ मधील सुपर ४ सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका समोरसमोर उभे ठाकले आहेत. या सामन्यात भारताने अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरवार प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून २०२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला हा सामना जिंकून या स्पर्धेतील शेवट गोड करण्यासाठी २०३ धावा कराव्या लागणार आहे. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने १ विकेट घेतली.
आज २६ सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेतील शेवटचा सुपर ४ सामना श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामान्याआधी श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले.
हेही वाचा : ‘या’ भारतीय दिग्गजांचे स्थान धोक्यात! डी कॉकच्या पुनरागमनामुळे होणार मोठी उलटफेर; मोडले जाणार अनेक विक्रम
भारताची सुरवात मात्र खराब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताला गिलच्या रूपात पहिला झटका बसला. गिल कॉट अँड बोल्ड झाला. त्याला महेश तिक्षानाने बाद केले. त्यानंतर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादव या सामन्यात देखील अपयशी ठरला आणि तो १३ चेंडूत १२ धावा काढून बाद झाला. त्याला वानिंदू हसरंगाने माघारी पाठवले. त्यानंतर अभिषेक शर्माने या स्पर्धेत सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक करून शर्मा माघारी गेला. त्याने ३१ चेंडूचा सामना करत ६१ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याला चारिथ असलंकाने बाद केले.
त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने भारताचा डाव सांभाळला. या दरम्यान संजू सॅमसन ३९ धावा करून बाद झाला. त्याला दासुन शनाकाने आपली शिकार बनवले. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्या काही खास करू शकला नाही. तो २ धावांवर बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले. टिलक वर्माने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने नाबाद ४९ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. तर अक्षर पटेलने नाबाद २१ धावा केल्या. श्रीलंकेकडून चारिथ असलंका १, दुष्मंथा चमीरा १ , वानिंदू हसरंगा १ , महेश तिक्षाना १ , दासुन शनाका १ विकेट घेतल्या.
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन : पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, चारिथ असलंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, जेनिथ लियानागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, नुवान तुषारा
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती