सावधान! पुढील आठवडाभर या राज्यात पावसाचा 'भीषण' प्रकोप (Photo Credit - X)
🌊 Cyclone Senyar Formation Ruled Out; Depression to Bring Heavy Rain to North Tamil Nadu (Nov 28-30) 🌧️ Primary System: Depression Threat Over North Tamil Nadu. A Low Pressure Area (LPA) formed today morning over the Comorin Sea and adjoining Southwest Bay of Bengal.… pic.twitter.com/4cPqcmtiqw — Parthan IN Weather (@PIW44) November 25, 2025
या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
IMD नुसार, आगामी दिवसांत दक्षिण आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पाऊस आणि त्यानंतर २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पावसाचा दुसरा तीव्र टप्पा दिसू शकतो. केरळ आणि माहेमध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत या भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे येथे २५ आणि २९ नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस, तर २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान अति मुसळधार पावसाची गंभीर चेतावणी (Warning) देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि यानम येथे पूर्व किनारपट्टीवर २९ नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस पडेल आणि ३० नोव्हेंबर रोजी तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
वादळाला ‘सेन्यार’ नाव
जर ही प्रणाली चक्रीवादळात विकसित झाली, तर त्याचे नाव ‘सेन्यार’ (Senyar) ठेवले जाईल, ज्याचा अर्थ “सिंह” असा आहे. हे नाव संयुक्त अरब अमिरातीने (UAE) सुचवले आहे.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
IMD ने इशारा दिला आहे की, ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. मेघगर्जनेसह पाऊस आणि समुद्रातील उधाण (उंच लाटा) यामुळे अनेक किनारी भागांत पाणी साचणे (Waterlogging), स्थानिक पूर आणि वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने किनारी आणि प्रभावित भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आणि हवामान विभागाच्या ताज्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.






