वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेला अंडर-19 विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अँटिग्वा येथे होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहे. टीम इंडिया विजयासाठी फेव्हरेट मानली जात आहे.
उपांत्यपूर्व फेरीत भारताने एकतर्फी लढतीत बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम चारमध्ये स्थान पक्के केले. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने ११९ धावांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ वर्षे भारत हरला नाही
अंडर-19 विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ७ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने ५ तर कांगारू संघाने दोन जिंकले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या स्पर्धेत भारताने गेल्या २४ वर्षांपासून एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने शेवटची वेळ १९९८ मध्ये भारताचा पराभव केला होता.
१९९८ नंतर या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण ५ सामने खेळले गेले आणि भारतीय संघ सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. भारताने बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ३ सामने खेळले आणि सर्व जिंकले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवूनच २०१२ आणि २०१८ अंडर-19 WC जिंकले. त्याचवेळी २००० च्या उपांत्य फेरीतही ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.
दोन्ही संघ:
IND– यश धुल (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना, निशांत सिंधू, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर, वासू वत्स, रवी कुमार.
AUS– कूपर कॉनोली (कर्णधार), कॅम्पबेल केलावे, टीग वेली, एडन काहिल, कोरी मिलर, जॅक सेनफेल्ड, टोबियास स्नेल, विल्यम साल्झमन, जॅक निस्बेट, लचलान शॉ, टॉम व्हिटनी.
यंगिस्तान अप्रतिम फॉर्ममध्ये आहे
भारतीय संघाने चालू स्पर्धेत आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. संघाने मालिका टप्प्यात 3 सामने खेळले आणि सर्व जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संघाने बांगलादेशचे ५ गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, ज्यात ३ जिंकले आहेत आणि एक संघाचा पराभव झाला आहे.
दोन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध त्याने ७१ चेंडूत ९७ धावा केल्या असून भारताला त्याच्या बॅटवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे.






