फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज : काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महिला T२० विश्वचषक २०२४ चा पहिला सेमीफायनलचा सामना पार पडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ८ विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता उपांत्य फेरी गाठली होती. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाचे खेळाडूं फेल झाले आणि त्यांना सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आता आज या महिला T२० विश्वचषकाचा दुसरा सामना आज रंगणार आहे. हा सामान न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबईमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. या दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारीवर एकदा नजर टाका.
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज विश्वचषकातील सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आहे. याआधी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील हेड टू हेड आकडेवारी कशी असेल यावर एकदा नजर टाका. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यत २० T२० सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यत ११ सामने जिंकले आहेत आणि ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर वेस्ट इंडिजच्या संघाने ७ सामने जिंकले आहेत आणि ११ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर या दोन संघामध्ये दोन सामने अनिर्णयीत राहिले आहेत.
All ready for Semi-Final 2 👀
Who will join South Africa in the #T20WorldCup Final? 🏆#WIvNZ preview 📲 https://t.co/He4Kc1Xz8x#WhateverItTakes pic.twitter.com/sbwXu4eVp5
— ICC (@ICC) October 18, 2024
न्यूझीलंडच्या संघाचे आतापर्यत विश्वचषकामध्ये चार सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर एक सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर वेस्ट इंडिजच्या संघाचे सुद्धा विश्वचषकामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये तीन सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत, तर एक सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील सामना टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तर या सामन्याची ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहता येणार आहे.