IPL च्या इतिहासातील सर्वात महाग विकले जाणारे अनकॅप खेळाडू; सर्व विक्रम निघाले मोडीत
IPL History : अलीकडेच, सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात IPL 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली ऋषभ पंतवर लागली. पंतला 27 कोटींना विकले गेले. अशा परिस्थितीत, आयपीएल लिलावात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूबद्दल जाणून घेऊया.
Rishabh Pant : २७ कोटींचा ऋषभ पंत, क्रिकेटच नाही तर गुंतवणूक करण्यातही आहे सर्वांत पुढे!
मेगा लिलावात खेळाडूंवर मोठा पैसा खर्च
इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी झालेल्या मेगा लिलावात खेळाडूंवर खूप पैसा खर्च करण्यात आला. विशेषत: भारतीय खेळाडू या मेगा लिलावात श्रीमंत झाले. ऋषभ पंतसारख्या खेळाडूवर लिलावात विक्रम मोडले गेले. ऋषभ पंतला लखनऊ सुपरजायंट्स संघाने 27 कोटींची मोठी बोली लावून खरेदी केले आहे. तथापि, येथे आपण त्या तीन अनकॅप्ड खेळाडूंबद्दल बोलू ज्यांच्यावर लिलावात प्रचंड पैसा खर्च झाला.
आवेश खानवर 10 कोटींची मोठी बोली
आवेश खान आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच करोडपती
इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात लखनऊ सुपरजायंट्स संघाने 2022 साली वेगवान गोलंदाज आवेश खानवर आपला खजिना उघडला होता. लखनऊच्या टीमने आवेश खानवर 10 कोटींची मोठी बोली लावली होती. अशाप्रकारे, आवेश खान गेल्या 10 हंगामात सर्वात महाग विकला जाणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
Krishnappa Gowtham
या यादीत कृष्णप्पा गौतम दुसऱ्या क्रमांकावर
कुष्णप्पा गौतमलाही आयपीएल लिलावात भरपूर पैसे मिळाले आहेत. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने विक्रमी बोली लावली होती. सीएसके संघाने गौतमवर ९.२५ कोटी रुपये खर्च केले होते.
वरुण चक्रवर्तीवर 8.40 कोटी रुपयांची विक्रमी बोली
वरुण चक्रवर्तीही झाला श्रीमंत
मिस्ट्री स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेला वरुण चक्रवर्ती आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडूदेखील ठरला आहे. IPL 2020 मध्ये पंजाब किंग्ज संघाने वरुण चक्रवर्तीवर 8.40 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली होती.