दिलीप वेंगसरकर आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव करून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यांनंतर दूसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभवे कला होता. या विजयासह भारताने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात संघाने दुसऱ्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली होती. या युवा संघाचे भारताचे माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी कौतुक केले आहे. ते म्हणले की तरुण खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ते भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यास सक्षम आहेत.
हेही वाचा : HCA प्रमुखांकडून ब्लॅकमेलिंग! SRH च्या मालकीण काव्या मारन यांची तक्रार; बड्या अधिकाऱ्यांना अटक
वेंगसरकर म्हणाले की, ‘जागतिक दर्जाचे’ कर्णधार म्हणून निर्णय घेण्यासाठी शुभमन गिलने भरपूर धावा करणे खूप महत्वाचे आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली, तर दौऱ्याची सुरुवात लीड्स मध्ये झालेल्या निराशाजनक पाच विकेटच्या पराभवाने झाली. भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या गिलने फक्त चार डावांमध्ये तीन शतकांसह ५८५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या २६९ धावा आहे.
वेंगसरकर पुढे म्हणाले की, कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने खूप चांगले काम केले. दबावाशिवाय निर्णय घेता यावेत आणि आघाडीवर राहून नेतृत्व करता यावे यासाठी त्याने धावा काढणे खूप महत्वाचे होते, जे खूप महत्वाचे आहे आणि त्याने ते केले आहे. तो एक अनुभवी खेळाडू आहे. तो एक जागतिक दर्जाचा फलंदाज आहे आणि त्याने इंग्लंडमध्ये हे दाखवून दिले. गिल सर्व परिस्थिती हाताळण्यास सक्षम इंग्लंडमधील परिस्थिती पाहता, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला होता.
हेही वाचा : IND vs ENG Toss Update : शुभमन गिल – बेन स्टोक्स आमनेसामने! इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार
काही प्रमुख खेळाडू नसतानाही भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वेंगसरकर यांनी इमर्जिंग प्लेयर्स टूर्नामेंटमध्ये कोहलीच्या प्रभावी कामगिरीचे उदाहरण दिले ज्याने भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचे लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियातील उदयोन्मुख स्पर्धेसाठी मी अंडर-२३ खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय घेतला. इतर संघांनीही अशा कसोटी खेळाडूंना खेळवले जे राष्ट्रीय संघाचा भाग नव्हते. प्रवीण आमरे प्रशिक्षक होते, मी त्यांना विराटसोबत डावाची सुरुवात करण्यास सांगितले आणि त्याने शतकच केले नाही तर सामनाही जिंकून दिला.