Team India : सर्वांच्या नजरा भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील T20 मालिकेवर असतील. युवा खेळाडूंसाठी ही मालिका मोठी संधी असणार आहे. या मालिकेत मोठे खेळाडू विश्रांतीवर असणार आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माऐवजी कोणता खेळाडू संघाच्या डावाची सुरुवात करणार हे पाहणे सर्वात खास ठरणार आहे.
रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाबाहेर जाणार आहेत. रोहित शर्माऐवजी संघाची कमान केएल राहुलकडे असेल. त्याचबरोबर या मालिकेत रोहितऐवजी ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा सलामीवीर बनू शकतो. आयपीएल 2022 गायकवाडसाठी चांगले राहिले नसले तरी त्याने आपल्या खेळाने अनेक वेळा सामने जिंकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी डावाची सुरुवात करणाऱ्या ऋतुराज गायकवाडसाठी आयपीएल 2022 हे भयानक स्वप्न होते. त्याने या मोसमातील 14 सामन्यांत केवळ 26.29 च्या सरासरीने 368 धावा केल्या. या मोसमात त्याला केवळ 3 वेळा 50 चा टप्पा पार करता आला. या संपूर्ण मोसमात रुतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जला (CSK) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरला.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2021 चे विजेतेपद पटकावले. या मोसमात ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा करत संघाला स्वबळावर चॅम्पियन बनवले. आयपीएल 2021 मध्ये, त्याने 16 सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राइक रेटने 635 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप देखील जिंकली. यादरम्यान त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले आयपीएल शतकही झळकावले.
केएल राहुल (क), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीप), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक