वरुण चक्रवर्तीची टीम इंडियामध्ये एन्ट्री (फोटो- BCCI सोशल मीडिया)
Varun Chakaravarthy: नुकतीच इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका पार पडली आहे. या मालिकेत 4 -1 अशी मालिका भारताने जिंकली आहे. तर आता भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र टी-20 सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडविरुद्धच्याय वनडे सामन्यांसाठी चक्रवतीला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड आणि भारताचा पहिला एकदिवसीय सामना हा नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. ज्यासाठी दोन्ही संघ नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान वरुण चक्रवरती देखील नागपूरला पोहोचला आहे. तयाचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
Varun Chakaravarthy added to India’s squad for ODI series against England.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 4, 2025
वरुण चक्रवतीची इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये निवड झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील तो खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे वनडे सामन्यांत देखील तयाचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरिज ने सन्मानित करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक छाप
वरुण चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक छाप सोडली आहे. हा वरुण चक्रवर्ती आता पूर्वीसारखा नाही, पण परतल्यानंतर त्याची शैली आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आणि आता त्याला त्याचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे त्याच्या ICC रँकिंगवरही परिणाम झाला आहे. ICC ने टी-२० गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये वरुण चक्रवर्तीने एक, दोन किंवा १० नाही तर २५ खेळाडूंना मागे टाकले आहे. त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टॉप ५ गोलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
हेही वाचा: ICC रॅंकींगमध्ये वरुण चक्रवर्तीची चमक; एकाच वेळी 25 खेळाडूंना मागे टाकत रचला अनोखा विक्रम
भारताचा वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये
ICC च्या ताज्या टी-२० क्रमवारीत वरुण चक्रवर्ती ५ व्या क्रमांकावर आला आहे. त्याचे ६७९ रेटिंग गुण आहेत. इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा टॉप ५ मध्ये समावेश नाही. पण, जर आपण टॉप १० बद्दल बोललो तर, वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांची नावे देखील आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दिसतात. अर्शदीप सिंग नवव्या स्थानावर आहे. तर रवी बिश्नोई आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे.
वरूणचा वर्ल्ड रेकॉर्ड
वरुण चक्रवर्तीने त्याच्या १६ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्यांदा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच वेळी, अजंता मेंडिसने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ सामन्यांमध्ये दोनदा ५ विकेट्स घेतल्या होत्या.
सध्या जागतिक रेकॉर्डमधील अशी संख्या आणि या खेळाडूंची नावं यादीत समाविष्ट आहेत.