वरूण चक्रवर्तीच्या नावे नवा वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला (IND vs ENG, 3rd T20I). इंग्लंडने भारताचा २६ धावांनी पराभव केला, हा इंग्लंडचा टी-२० मालिकेतील पहिला विजय आहे. भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, करिष्माई भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीने ५ विकेट घेत खळबळ उडवून दिली. वरूणने ही कामगिरी करत जागतिक रेकॉर्ड बनवला आहे.
वरुणने टी२० मध्ये दुसऱ्यांदा ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. जेव्हा जेव्हा वरुणने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ बळी घेतले आहेत तेव्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे असे चित्र सध्या आहे. मात्र तिसऱ्या टी-२० मध्ये, वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २४ धावा देत ५ बळी घेत चमत्कार केला. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, वरुण चक्रवर्तीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एक खास विश्वविक्रम रचला. वरुण हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कमीत कमी सामन्यांमध्ये दोनदा ५ बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
वरूणचा वर्ल्ड रेकॉर्ड
वरुण चक्रवर्तीने त्याच्या १६ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्यांदा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच वेळी, अजंता मेंडिसने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ सामन्यांमध्ये दोनदा ५ विकेट्स घेतल्या होत्या.
IND vs ENG 3rd T20: इंग्लंडचं कमबॅक; भारताला सिरीज जिंकण्यापासून रोखलं, २६ धावांनी केला पराभव
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
याशिवाय, वरुण चक्रवर्ती सलग १० डावांनंतर टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. वरुणने आतापर्यंत सलग १० टी-२० डावांनंतर २७ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. राशिद खानने सलग १० डावात ३० विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्यावेळी अफगाणिस्तान पूर्ण सदस्य संघ नव्हता. याचा अर्थ वरुणने पूर्ण सदस्य संघासाठी हा महान विक्रम स्वतःकडे केला आहे.
सलग १० टी२० डावांमध्ये भारतीयांनी घेतलेले सर्वाधिक बळी






