ऑलराउंडर मिचेल मार्श(फोटो-सोशल मीडिया)
Mitchell Marsh retires from red ball cricket : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. त्यानंतर आता ५ सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे. तसेच दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आपल्या मायदेशात इंग्लंड विरुद्ध अॅशेस मालिका खेळत आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून चकित करणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा टी 20i कॅप्टन आणि अनुभवी अष्टपैलू मिचेल मार्श याने राज्यस्तरीय रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा हा स्टार खेळाडू मिचेल शेफील्ड शील्ड स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार नाही.
हेही वाचा : काय सांगता? 2025 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी वाईट स्वप्न! 40 दिग्गजांनी घेतला अखेरचा श्वास
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये मिचेल मार्शला आपली छाप पाडता आली नाही. त्यानंतर मिचेल मार्शने आपल्या सहकाऱ्यांना निवृत्तीच्या निर्णयाबाबत माहीटी दिली. मार्श 2019 पासून राज्यस्तरीय पातळीवर जास्त सामने खेळू शकलेला नाही. मिचेल मार्श आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे 2019 पासून फक्त 9 राज्यस्तरीय सामनेच खेळू शकला आहे. मार्शने 2009 साली वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून पदार्पण केलं होतं. मार्शने जवळपास 16 वर्षानंतर राज्यस्तरीत रेड बॉल क्रिकेटचा निरोप घेतला आहे. मात्र मार्श कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचे समजते.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समितीने बोलावल्यास मी एशेज सीरिजमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल अशी माहिती मार्शने दिली आहे. भविष्यात आणखी एक कसोटी सामना खेळणं कठीण दिसत असल्याचे मार्शने कबूल केले आहे. तसेच त्याआधी ऑस्ट्रेलिया निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी मार्शच्या एशेस सीरिजमध्ये खेळण्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटल होतं की, मार्शचा गेम एशेस सीरिजसाठी नवी ताकद देऊ शकतो.
मिचेल मार्श 11 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. मार्शने 2014 साली कसोटी पदार्पण केलं असून 11 वर्षांच्या कालावधीत तो फार कसोटी सामने खेळलेला नाही. मिचेल मार्शने आतापर्यंत 46 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 46 सामन्यांमध्ये 2 हजार 83 धावा केल्या आहेत. तसेच मार्शने 51 बळी देखील मिळवले आहेत. या स्टार अष्टपैलू खेळाडूने आपला अखेरचा कसोटी सामना हा भारतीय संघाविरुद्ध खेळला होता.






