फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आजपासून T२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आज मैदानात उतरणार आहे. भारताच्या संघाने अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान दिले आहे. आज बऱ्याच नव्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचा असणार आहे कारण भारताचा महिला क्रिकेट संघ T२० विश्वचषकामध्ये टीम इंडियाचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहेत. तर भारताच्या संघाने नुकतीच कसोटी मालिका नावावर केली आहे, त्यामुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघ सूर्याच्या कॅप्टन्सी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारत बांग्लादेश सामन्यात टीम इंडियासाठी सलामी फलंदाज अभिषेक कुमारची जागा पक्की आहे. परंतु त्याचा पार्टनर कोण असेल याचा विचार केला तर संघाला संजू सॅमसनला सलामी फलंदाज म्हणून मैदानामध्ये उतरू शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर असेल, त्यानंतर पुढे सरकत अष्टपैलू रियान पराग मधल्या फळीत सुरुवात करू शकतो. त्यानंतर अष्टपैलू नितीश रेड्डी पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. यानंतर हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. त्याच वेळी, रिंकू सिंगला सातव्या क्रमांकावर फिनिशर म्हणून पाहिले जाऊ शकते.
रवी बिश्नोई मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून गोलंदाजी विभागात सामील होऊ शकतो. बिश्नोई यांना रियान परागची साथ मिळू शकते. याशिवाय अर्शदीप सिंग, मयंक यादव आणि हर्षित राणा हे त्रिकूट वेगवान गोलंदाजी करताना दिसत आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश T२० मालिका जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केली जाईल, तर थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि स्पोर्ट्स 18 चॅनल 1 एचडी वर पाहता येणार आहे.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रियान पराग, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव, हर्षित राणा.