भारताच्या संघाने २०२४ चा विश्वचषक नावावर केला आता लवकर टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताच्या संघाकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडूंना भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता. यामध्ये काही खेळाडू यशस्वी झाले तर काही कॅप्टन फेल झाले. आता टीम इंडियाचे आतापर्यतचे सर्वात्तम कॅप्टन कोण आहेत यावर एकदा नजर टाका. फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांची यादी. फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत रोहितने सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. गांगुली पाचव्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १९५ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि ९७ वेळा विजयाचा झेंडा फडकवला आहे.
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने कर्णधार म्हणून आतापर्यंत ९८ सामने जिंकले आहेत. अहमदाबादमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ही कामगिरी केली, जिथे भारताने इंग्लंडला १४२ धावांनी हरवले. या मालिकेत भारताने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला. रोहितने सध्या १३७ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १३५ सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली. त्याने २१३ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. तो २०१३ ते जानेवारी २०२२ पर्यंत भारताचा कर्णधार होता.
मोहम्मद अझरुद्दीन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २२१ पैकी १०४ सामने जिंकले. अझरुद्दीन यांनी १९९० ते १९९९ पर्यंत भाटचे नेतृत्व केले.
एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने केवळ जास्तीत जास्त सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले नाही तर जास्तीत जास्त विजयही मिळवले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ३३२ पैकी १७८ सामने जिंकले.