फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफीचे गुणतालिकेचे गणित : भारताचा संघाने पहिल्या सामन्यात बांग्लादेशला पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. आता भारताने सलग दोन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. तर ग्रुप अ मधून सेमीफायनलमध्ये जाणारा दुसरा संघ हा न्यूझीलंडचा संघ आहे. त्यामुळे आता ग्रुप अ मधून यजमान संघ पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ आता सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर झाले आहेत. आता चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कोणत्या संघाशी सामना करेल?
दुसऱ्या गटामध्ये आज एक संघ सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करेल. टीम इंडियाचा अजूनही एक लीग सामना शिल्लक आहे. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला तर त्यांना त्यांचा पहिला सेमीफायनल खेळावा लागेल, परंतु टीम इंडिया हरली तरीसुद्धा ते त्यांचा पहिला सेमीफायनल खेळतील. पहिला उपांत्य सामना दुबई येथे होणार आहे.
भारताचा संघ जर न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला किंवा हरला तरी टीम इंडिया पहिला सेमीफायनलाच सामना खेळणार आहे. कारण सामन्याचे आयोजन हे A१ विरुद्ध B२ असे करण्यात आले आहे. A२ विरुद्ध B१ असा होणार आहे. त्यामुळे भारताचा संघ कर पहिला सेमीफायनाचा सामना खेळणार आहे तर दुसरा सेमीफायनलचा सामना न्यूझीलंडचा संघ खेळणार आहे.
पहिला सेमीफायनलचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. तर या सामन्याचे आयोजन ४ मार्च रोजी करण्यात आले आहे. भारताच्या संघाचा न्यूझीलंडविरुद्ध साखळी सामन्यांमध्ये पराभव झाल्यास संघाचा कोड A१ असणार आहे, तर न्यूझीलंडचा संघ A२ असणार आहे. ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ गटामधून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना ५ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन लाहोरमध्ये करण्यात आले आहे.
सेमीफायनलसाठी रिझर्व दिवस देखील ठेवण्यात आला आहे. ज्या दिवशी सामना असणार आहे काही कारणास्तव जर सामना थांबला ते रिझर्व दिनी तो सामना थांबलेला असेल तिथून सुरु केला जाणार आहे.