फोटो सौजन्य - X
चॅम्पियन ट्राॅफी ही हायब्रिड पद्धतीने खेळवला जाणार यावरुन मोठा वाद झाला होता. तरिही भारताचा संघ हा चॅम्पियन ट्राॅफी 2025 साठी पाकिस्तानला गेला नाही भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत जेतेपद जिंंकले. आता आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. आशिया कप सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे आणि भारताला त्याचे आयोजन करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आता पाकिस्तान आशिया कपआधी नवी उपाययोजना आखण्याच्या इराद्यात आहे. आशिया कप रद्द झाल्यास किंवा पुढे ढकलल्यास ऑगस्टमध्ये ट्राय सिरीज आयोजित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यूएई आणि अफगाणिस्तानशी चर्चा करत आहे. आशिया कपच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पीसीबीने अफगाणिस्तान बोर्डाशी चर्चा सुरू केली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे.
“पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे सप्टेंबरमध्ये भारतात आशिया कप होण्याची शक्यता कमी असल्याने, पीसीबी आणखी एका ट्राय सिरीजच्या प्रस्तावावर काम करत आहे,” असे पीसीबीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. जर आशिया कप यूएईमध्ये झाला तर पाकिस्तान ऑगस्टमध्ये दुबईमध्ये अफगाणिस्तान आणि यूएईसोबत त्रिकोणी मालिका खेळेल. ही मालिका अफगाणिस्तानच्या पाकिस्तान दौऱ्याची जागा घेईल.
ते म्हणाले की, त्रिकोणी मालिका आयोजित करण्यासाठी पीसीबी आधीच दोन्ही क्रिकेट बोर्डांशी चर्चा करत आहे. जर आशिया कप पुढे ढकलला गेला तर पीसीबीला ऑगस्टमध्ये अफगाणिस्तान आणि यूएई संघांनी पाकिस्तानमध्ये ट्राय सिरीज खेळावी अशी इच्छा आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. आशिया कपबाबत निर्णय घेण्यासाठी एसीसी लवकरच बैठक घेणार आहे.
पाकिस्तानचा नुकताच बांग्लादेशविरुद्ध मालिका खेळवण्यात आल्या होत्या यामध्ये त्यांनी बांग्लादेशच्या संघाला व्हाइट वाॅश केले. अजुनपर्यत आशिया कप खेळवला जाणार आहे की नाही यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताचा संघ हा इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय पुरुष संघ हा 20 जूनपासुन कसोटी मालिका खेळणार आहे, तर भारतीय महिला संघ देखील इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. आता भारताची इंग्लड दौऱ्यावर कशी कामगिरी राहिल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.