फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये नुकतीच मालिका संपली आहे. या मालिकेमध्ये इंग्लंडचा दबदबा पाहायला मिळाला. या मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाने सलग तीन सामने जिंकून मालिका नावावर केली होती त्यानंतर वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यांमध्ये इंग्लंड विरुद्ध मालिकेमध्ये पहिला विजय मिळवला. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरकडे आहे. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळाला असता पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार होता पण पावसामुळे हा सामना वाहून गेला आणि सामना रद्द करावा लागला.
वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकले. त्यानंतर विंडीजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र पाच षटकांनंतर सामना पावसामुळे रोखण्यात आला त्यामुळे पुढे सामना होऊ शकला नाही. इंग्लंडने ही मालिका शानदार पद्धतीने जिंकली आहे. इंग्लंडच्या संघाने जोस बटलरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा 3-1 असा पराभव केला.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या पाचव्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजसाठी एविन लुईस आणि शाई होप सलामीला आले. या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. लुईसने 20 चेंडूत 29 धावा केल्या. तर होपने 14 धावा केल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने 5 षटकात एकही बिनबाद 44 धावा केल्या. मात्र त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने सामना रद्द करावा लागला.
A wet way to finish, but we claim the trophy at the end of the T20I series! 🏆
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/NXifUlenJQ
— England Cricket (@englandcricket) November 17, 2024
इंग्लंडने मालिकेची सुरुवात विजयाने केली. पहिला सामना त्यांनी 8 विकेटने जिंकला होता. हा सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला. दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. हा सामनाही बार्बाडोसमध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने तिसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला. हा सामना सेंट लुसिया येथे खेळला गेला. वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत 5 गडी राखून विजय मिळवला. मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
T20 series winners to finish off the West Indies tour! 🏆
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/VU8ectnJrK
— England Cricket (@englandcricket) November 18, 2024
फिलिप सॉल्टने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 4 डावात 162 धावा केल्या. रोव्हमन पॉवेल दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने 4 डावात 153 धावा केल्या. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत साकिब महमूद अव्वल राहिला. त्याने 9 विकेट घेतल्या.