फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली-जस्टिन लँगर : भारताचा अनुभवी खेळाडू आणि टीम इंडियाचा स्टार विराट कोहली आणि रोहित शर्माने T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि चाहते प्रचंड निराश झाले. पण विराट कोहली अजूनही कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. पण त्याला त्याचे लक मैदानावर साथ देत नाही आहे त्यामुळे त्याच्या कामगिरी त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. भारताचा संघ सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्वीकारण्यासाठी सज्ज होत आहे. भारताचा सर्व खेळाडू रोहित शर्माला सोडून ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आता ऑस्ट्रेलियन संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले. त्याचबरोबर विराट कोहलीच्या संदर्भात त्यांनी मोठा खुलासा देखील केला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत, त्यापैकी दोन ऑस्ट्रेलियात खेळल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’शी बोलताना सांगितले की, “जर विराट कोहली ऑस्ट्रेलियात खेळण्याची ही शेवटची वेळ असेल तर लोकांनी त्याचा आनंद घ्यावा. कारण सुपरस्टार विराट कोहली, रोहित शर्मा, अश्विन, जडेजा आहे, बुमराह आहे. त्यामुळे तुम्ही जमेल तेव्हा त्याचा आनंद घ्या, तो कायमचा राहणार नाही.”
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
लँगरने पुढे टीम इंडियाचे कौतुक करताना म्हटले, “एक गोष्ट तुम्ही कधीही चॅम्पियन्सना कमी लेखू नये, आणि हे प्रत्येक खेळात घडते, कारण ते एका कारणाने चॅम्पियन आहेत. भारतात दीड अब्ज क्रिकेट चाहते आहेत. “लोक तेथे आहेत, त्यांना उत्कृष्टतेशिवाय काहीही नको आहे.” 2020-21 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली तेव्हा जस्टिन लँगर म्हणाले होते की, या भारतीय संघाला कधीही कमी लेखू नका.
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने भारताचा दिग्गज स्टार खेळाडू विराट कोहलीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला चेतावणी दिली आहे. यावेळी डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी विराट कोहली ऑस्ट्रेलियाला येतो आणि येऊन येथील आव्हान स्वीकारतो. ऑस्ट्रेलियाला नक्कीच विराट कोहलीचा खेळ समजून घेण्याची गरज आहे कारण तो ऑस्ट्रेलियाला संघासाठी संकट ठरू शकतो आणि खूप धावा करू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पिंक बॉल कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ गाब्बाकडे जातील. ही मालिका सुमारे 50 दिवस चालणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल. याआधी बॉक्सिंग डे कसोटी सामनाही खेळवला जाणार आहे.
मागील काही सामान्यांपासून विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये नाही त्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेत त्याच्याकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. भारताच्या संघामध्ये अनुभवी आणि नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारताचा संघ रोहित शर्माच्या उपस्थित कशाप्रकारे कामगिरी करेल यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहे. बीसीसीआयने भारताच्या खेळाडूंची निवड बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी केली आहे. यामध्ये प्लेइंग ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.