फोटो सौजन्य - Instagram
टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज संपणार आहे. या सामन्याचा आज शेवटचा दिवस खेळला जाणार आहे त्याआधी चौथ्या दिनी भारताच्या संघाची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घेऊयात. यामध्ये विशेष कौतुक हे केएल राहुलचे असणार आहे. मागील गावामध्ये त्याने 42 धावा केल्या होत्या तर या या डावामध्ये त्याने शतक झळकावले आणि सोशल मीडियावर त्याचा मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. केएल राहुलच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच अथिया शेट्टी त्याची पत्नी.
राहुलच्या शतकीय खळी नंतर तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केले आहे या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या शतकानंतर, त्याची पत्नी अथिया शेट्टीने त्याच्यासाठी एक खास गोष्ट पोस्ट केली. खेळाच्या चौथ्या दिवशी राहुलने संयमाने आपले 9 वे कसोटी शतक झळकावले, ज्यामुळे भारत सामन्यात मजबूत स्थितीत आला.
खरंतर, केएल राहुलने पहिल्या डावात टीम इंडियासाठी चांगली सुरुवात केली होती आणि त्याने ४२ धावा केल्या होत्या, पण चुकीच्या शॉटमुळे तो बाद झाला होता. तथापि, दुसऱ्या डावात ३३ वर्षीय राहुल वेगळ्याच शैलीत दिसला आणि त्याने २०२ चेंडूंचा सामना करत शतक झळकावले. त्याने २४७ चेंडूंमध्ये १३७ धावा केल्या, ज्यामध्ये एकूण १८ चौकारांचा समावेश होता. त्याच्या शतकानंतर, त्याची पत्नी अथिया शेट्टीने इंस्टाग्रामवर त्याच्यासाठी एक खास स्टोरी पोस्ट केली.
Athiya Shetty’s Instagram story for KL Rahul ❤️#INDvsENG #KLRahul #AthiyaShetty #CricketTwitter pic.twitter.com/7By06l7BEb
— InsideSport (@InsideSportIND) June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लड पहिल्या सामन्याच्या शेवटचा दिवस असणार आहे, यामध्ये भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या बळावर भारताने आपली पकड मजबूत केली. टीम इंडियाने इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले आहे, ज्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता २१ धावा केल्या आहेत. सध्या ते लक्ष्यापेक्षा ३५० धावांनी मागे आहे.