रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma’s retirement : भारत नुकताच इंग्लड दौऱ्यावरून परतला आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थित शानदार कामगिरी केली. इंग्लडविरुद्ध पाच सामान्यांच्या मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. अशातच भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यापूर्वी बातम्या येत आहेत की रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा हा शेवटचा दौरा असण्याची शक्यता आहे. यावर आता रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भाष्य केले आहे.
लाड यांनी म्हटलं आहे की, ‘रोहितने २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळावे.’ २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवण्यात येणार आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२७ या कालावधीत असणार आहे.
दिनेश लाड म्हणाले की, रोहितने २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळत राहावे. आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी अजून दोन वर्षांहून अधिक कालावधी बाकी आहे. दरम्यान, त्याआधी भारत अनेक एकदिवसीय सामने खेळणार आहे, परंतु या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या भविष्याबद्दल शासंकता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटला फुलस्टॉप? BCCI कडून मोठा खुलासा; वाचा सविस्तर..
यावेळी रोहितला २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकातून वगळण्यात आल्याच्या घटनेची आठवण करून देत, लाड म्हणाले की, “उजव्या हाताच्या फलंदाजाकडे अजूनही देशासाठी योगदान देण्याची ‘भूक’ आणि ‘निर्धार’ बाकी आहे.”
लाड यांनी आयएएनएसला सांगितले की, “रोहित शर्माने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायला हवे. ट्रॉफी जिंकणे हे त्याचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. तथापि, तो २०११ च्या विजयी संघाचा भाग असण्याची संधी गमावली आहे. रोहित संघाचे नेतृत्व करेल की नाही हे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांवर अवलंबून असणार आहे, परंतु तो विश्वचषक संघाचा भाग असायला हवा.”
हेही वाचा : पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला ग्रहण का लागले? रोहित शर्माच्या प्रशिक्षकाने केला ‘हा’ खळबळजनक खुलासा..
रोहित शर्माने भारतासाठी २७३ एकदिवसीय सामने खेळून त्यात ३२ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ११,१६८ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये तीन द्विशतके करण्याचा विक्रम देखील केला आहे.