फोटो सौजन्य – X (Wimbledon)
विम्बल्डन 2025 विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम : विम्बल्डन 2025 चा नवा चॅम्पियन जगाला मिळाला. अल्काराज विरुद्ध सिनर या दोघांमध्ये हा सामना खेळण्यात आला होता. जागतिक क्रमवारीमध्ये पहिला स्थानावर असलेल्या सिनरने अल्काराज याला पराभूत करून पहिल्यांदा विम्बल्डन टायटल नावावर केले. विम्बल्डन २०२५ चा अंतिम सामना दोन वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेला स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि इटलीचा जॅनिक सिन्नर यांच्यात झाला. सिन्नरने सलग दोन वर्षे विजेतेपद जिंकणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा तीन तास चाललेल्या अंतिम सामन्यात ४-६, ६-४, ६-४, ६-४ असा पराभव करून गवताच्या कोर्टवर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
लंडनमधील ऑल इंग्लंड टेनिस क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रँड स्लॅम विम्बल्डनला एक नवीन विजेता मिळाला आहे. तीन तास चाललेल्या विजेतेपदाच्या सामन्यात सिनेरने कार्लोस अल्काराजचा ४-६,६-४,६-४,६-४ असा पराभव करून पहिल्यांदाच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले. पहिल्यांदाच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकल्यानंतर त्याला किती बक्षीस रक्कम मिळाली ते जाणून घेऊया?
Il Primo 🇮🇹
Jannik Sinner is Italy’s first singles champion at #Wimbledon pic.twitter.com/DBrT4Kj2nP
— Wimbledon (@Wimbledon) July 13, 2025
सिन्नर हा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू ठरला. विम्बल्डनच्या १४८ वर्षांच्या इतिहासात, आजपर्यंत कोणत्याही इटालियन खेळाडूला पुरुष एकेरीचा विजेता मान मिळाला नाही. १८७७ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत विजेता ठरणारा सिन्नर हा पहिला इटालियन खेळाडू ठरला. यासह, सिनेरने गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत अल्काराझकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.
सिनेरच्या कारकिर्दीतील हे चौथे ग्रँड स्लॅम जेतेपद होते. त्याने आतापर्यंत चार ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत, तर कार्लोस अल्काराजच्या नावावर पाच ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. या विजयासह, सिनेर आता अल्काराजपेक्षा फक्त एक ग्रँड स्लॅम मागे आहे. हे जेतेपद जिंकल्यानंतर २३ वर्षीय सिनेरला किती बक्षीस रक्कम मिळाली ते जाणून घेऊया.
२०२५ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर जॅनिक सिन्नरने ३,०००,००० पौंड (Three million pounds) जिंकले. त्याला भारतीय रुपयांमध्ये ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस रक्कम मिळाली. विम्बल्डन २०२५ मध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर कार्लोस अल्काराजने £१,५२०,००० (One million five hundred and twenty thousand pounds) जिंकले. भारतीय चलनात हा आकडा अंदाजे ₹१७ कोटी इतका आहे. उपांत्य फेरीत पोहोचल्याबद्दल नोवाक जोकोविच आणि टेलर फ्रिट्झ यांना प्रत्येकी £७७५,००० मिळाले, जे अंदाजे ₹९ कोटी इतके आहे.