फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
महिला T२० विश्वचषक २०२४ : काल महिला विश्वचषक २०२४ चा दुसरा सेमीफायनलचा सामना पार पडला आहे. महिला T२० विश्वचषक २०२४ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ एकमेकांशी भिडले. त्यानंतर आता दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये भिडत झाली. आता दोन्ही उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर जगाला महिला विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये खेळणारे दोन संघ मिळाले आहेत. पहिला सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये जागा मिळवली आहे.
महिला T२० विश्वचषक २०२४ च्या सामन्याचे आयोजन २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. महिला T२० विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये खेळणारे दोन संघ मिळाले आहे, दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम सामना रंगणार आहे. त्याचबरोबर जगाला नवा चॅम्पियन सुद्धा मिळणार आहे. हा स्पर्धेचा शेवटचा सामना असणार आहे. या सामना भारतीय प्रेक्षकांना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता पाहता येणार आहे, तर या सामन्याचे नाणेफेक ७ वाजता होणार आहे.
Two worthy finalists 🔥
Who takes home the #T20WorldCup 2024 trophy? 🏆
More ➡️ https://t.co/0PfpOQ3SKE pic.twitter.com/2aWDBSakpn
— ICC (@ICC) October 19, 2024
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये महिला T२० विश्वचषक २०२४ चा फायनलचा सामना हे दोन संघ खेळताना दिसणार आहे. याआधी हे दोन संघ ७५ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध ४२ वेळा सामने जिंकले आहेत तर २५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचं झालं तर संघाने आतापर्यत २५ सामने जिंकले आहेत तर ४२ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ सामने अनिर्णयीत राहिले आहेत. मागील आकडेवारी पाहता दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं पारडं जाड दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने महिला T२० विश्वचषक २०२४ च्या एकही सामना न गमावलेल्या बलाढ्य संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत करून फायनलमध्ये स्थान मिळाले आहे.