फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला T-२० वर्ल्ड कप २०२४ : आजपासून महिला T२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२४ च्या या विश्वचषकामध्ये १० संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये दोन गट पाडले आहेत. या सामान्यांचे आयोजन UAE येथे करण्यात आले आहे. ग्रुप A मध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघाचा समावेश आहे. आजपासून महिला T-२० वर्ल्ड कपचा शुभारंभ होणार आहे. गट B मधील संघाचा आज पहिला सामना रंगणार आहे. हा सामना बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.
तर गट A मधील सामना स्पर्धेचा दुसरा सामना असणार आहे. हा सामना दोन आशियाई देशामध्ये रंगणार आहे. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आज आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. तर दुसरा सामना हा संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
भारताचा संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यामध्ये भारताचा संघ पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत दोन सराव सामने झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेला हरवले. भारतीय महिला संघ या स्पर्धेची सुरुवात विजयाने करेल अशी आशा आहे.
निगार सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, शोरना अख्तर, रितू मोनी, शोभना मोस्तारी, राबेया, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अख्तर, जहाँआरा आलम, दिलारा अख्तर, ताज नेहार, शती राणी, दिशा बिस्वा.
कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस (उप-कर्णधार), लॉर्ना जॅक-ब्राऊन, ॲबे एटकेन-ड्रमंड, अबटा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, रेचेल स्ला , कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल.
फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसच्या अधीन), सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब , तुबा हसन.
चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षीका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधिका प्रबोधिनी, गगनशिका कुमारी, गौतम कुमारी, अचिनी कुलसूरिया, गौतम कुमारी.