फोटो सौजन्य - Gujarat Giants/ UP Warriorz सोशल मीडिया
महिला प्रीमियर लीग २०२५ – गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स : महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये आज गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा येथे संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाणार आहे, सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी नेणेफेकी होईल. या हंगामातील गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी, यूपी वॉरियर्स त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. गुजरात जायंट्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला गेला होता, ज्यामध्ये गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला.
गुजरातचा संघाचा पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आज विजयाच्या हेतूने मैदानामध्ये उतरतील आणि मजबूत खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतील. आता गुजरात संघ मागील सामन्यातील चुका विसरून हा सामना जिंकू इच्छितो, तर यूपी वॉरियर्स संघ गुजरातला हरवून डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छितो. त्याचबरोबर, या सामन्यात चाहत्यांच्या नजरा दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर असणार आहेत. गुजरात जायंट्सच्या पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या सामन्यात गुजरात जायंट्सची फलंदाजी अद्भुत होती. तथापि, संघाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात नक्कीच सुधारणा करायला आवडेल. आरसीबी विरुद्ध गुजरातकडून खूपच खराब क्षेत्ररक्षण दिसून आले. गुजरातच्या बेथ मुनी आणि अॅशले गार्डनर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत, दोन्ही खेळाडूंनी गेल्या सामन्यात अर्धशतके झळकावली होती. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा संघाला या दोन खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतील.
New season, new challenges, same smooth journeys with @EaseMyTrip! 😍 Bring on matchday 1! 😎#UPWarriorz #TATAWPL #EaseMyTrip #ChangeTheGame pic.twitter.com/DkR1pKJmYw
— UP Warriorz (@UPWarriorz) February 16, 2025
महिला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर युपी वॉरियर्स संघ सोडला तर सर्व संघाचे प्रत्येकी १ सामना झाला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आणि दिल्ली कॅपिटल्सने या सिझनची सुरुवात विजयाने केली आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सने पहिला सामना गमावला आहे. आज युपी वॉरियर्सचा पहिला सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे.
Champions Trophy 2025 साठी दुबईला पोहोचली टीम इंडिया, या खेळाडूंवर असेल क्रिकेट चाहत्यांची नजर
दीप्ती शर्मा (कर्णधार), श्वेता सहरावत, चामारी अटापट्टू, चिनेल हेन्री, उमा छेत्री (यष्टीरक्षक), वृंदा दिनेश, ग्रेस हॅरिस, आरुषी गोयल, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एलाना किंग, सोफी एक्लेस्टोन.
अॅशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड्ट, दयालन हेमलता, सिमरन शेख, डिएंड्रा डॉटिन, हरलीन देओल, तनुजा कंवर, सायली सातघरे, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा.