फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
महिला प्रीमियर लीग गुणतालिका : काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना झाला. या स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये चांगली सुरुवात केली. तर दुसरीकडे गुजरात जायंट्सची स्पर्धेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. आरसीबीने त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने सलग जिंकले होते, पण आता आरसीबी विजयी मार्गावरून जात असल्याचे दिसून येत आहे. २ विजयांनंतर, आरसीबीला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे पॉइंट टेबलमध्ये आरसीबीचे स्थान आणखी वाईट होत चालली आहे.
हार्दिक पंड्या भारतीय संघाचा अमूल्य खेळाडू, नजर टाका आकडेवारीवर, या दिग्गज खेळाडूने केला दावा
गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी, महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. गुजरातने हा सामना ६ विकेट्सने जिंकला होता. गुजरातचा हा हंगामातील दुसरा विजय असला तरी, आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव होता. महिला प्रीमियर लीगबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात जायंट्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघाचे ५ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबी संघ ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीचा नेट रन रेट +०.१५५ आहे.
चौथ्या स्थानावर युपी वॉरियर्सचा संघ आहे, युपीच्या संघाने ५ सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांनी तीन सामने गमावले आहेत तर दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे युपीचा संघ ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. दिल्ली कॅपिटल्सचे ५ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. WPL २०२५ च्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. मुंबईचे ४ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Clinical bowling performance 🤝 A captain’s knock#GG get back to winning ways with a dominant 6️⃣-wicket victory👏💪
Scorecard ▶️ https://t.co/G1rjRvSkxu#TATAWPL | #RCBvGG | @Giant_Cricket pic.twitter.com/V0294LMcn6
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 27, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून १२५ धावा केल्या. बंगळुरूच्या टॉप ऑर्डरने खूपच निराशा केली. स्मृती मानधना किंवा एलिस पेरी दोघेही जास्त काळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. आरसीबीकडून कनिका आहुजाने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली, तिच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. आरसीबीविरुद्धच्या या धावांचा पाठलाग करताना, गुजरात जायंट्सची कर्णधार अॅशले गार्डनरने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह ५८ धावांची शानदार खेळी केली. गुजरातने ६ विकेट्स आणि २१ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.