नवीन प्रमोशनल ऑफरसाठी काय करावे लागेल?
जिओने एक नवीन प्रमोशनल ऑफर आणली आहे. त्यामद्ये काही निवडक वापरकर्त्यांसाठी तीन महिन्यांसाठी ‘JioHotstar Premium’ फ्री असणार आहे. म्हणजे तीन महिने JioHotstar Premium वापरण्यासाठी पैसे लागणार नाही. विशेष म्हणजे तुम्हाला त्यासाठी कुठलाही अर्ज, नोंदणी किंवा स्वतंत्रपणे रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. हे ऑफर वर्पारकर्त्यांच्या खात्यांमध्ये आपोआप सक्रिय होते.
JioHotstar Premium ऑफर काय आहे?
जिओ निवडक वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी JioHotstar Premium फ्री देत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनचे सर्व फायदे मिळणार आहे. ज्यामध्ये सपोर्टेड कंटेंटमध्ये ऐड-फ्री स्ट्रीमिंग, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि विदेशी टीवी शो, हाय-डेफिनिशन मूवीज, लाइव स्पोर्ट्स स्ट्रीमिंगसह उत्कृष्ट व्हिडिओ आणि ऑडियो क्वालिटीचा आनंद घायल मिळेल.
अनेकांनी शेअर केले आपले मत
या ऑफेरबद्दल अनेक जिओ वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे की, त्यांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने JioHotstar मध्ये लॉग इन करताच त्यांची खाती आपोआप प्रीमियममध्ये अपग्रेड झाली. काहींना त्यांच्या फोनवर त्यांच्या मोफत JioHotstar प्रीमियमची घोषणा करणारा संदेश देखील मिळाला.
कोणत्या प्लॅनमध्ये मिळणार ‘JioHotstar’ फ्री
जर तुम्हाला मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन मिळाले नसेल, तर तुम्ही काही रिचार्ज प्लॅनमध्ये ते मिळवू शकता. Jio काही प्रीपेड प्लॅनसह JioHotstar मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
949 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला ९० दिवसांचे JioHotstar सबस्क्रिप्शन
1,029 रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिले
3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिने
3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षाचे सब्स्क्रिप्शन फ्री देत आहे.
Ans: निवडक Jio प्रीपेड ग्राहकांना ही ऑफर आपोआप दिली जात आहे.
Ans: नाही, कोणताही अतिरिक्त रिचार्ज किंवा अर्ज आवश्यक नाही.
Ans: जाहिरातमुक्त कंटेंट, लाईव्ह स्पोर्ट्स, आंतरराष्ट्रीय शो, HD स्ट्रीमिंग आणि उत्तम ऑडिओ-व्हिडिओ गुणवत्ता.






