Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री
कंपनीच्या या आगामी स्मार्टफोन सिरिजची डिझाईन सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाली आहे. आता या स्मार्टफोन्सची किंमत देखील लीक झाली आहे. याशिवाय, हे दोन्ही फोन्स भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर लिस्ट झाले आहेत. तसेच आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स असणार आणि कोणते स्पेसिफिकेशन्स दिले जाणार, याची माहिती देखील लाँचिंगपूर्वीच समोर आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. ही स्मार्टफोन सिरीज मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. भारतात आगामी स्मार्टफोन सिरीज 55,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केली जाऊ शकते. या सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल Vivo V70 पॅशन रेड आणि लेमन येलो कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर सीरीजमधील Vivo V70 Elite मॉडेल या दोन रंगाव्यतिरिक्त ब्लॅक शेडमध्ये देखील लाँच केला जाऊ शकतो.
वीवोच्या अपकमिंग सीरीजचे दोन्ही फोन्स एकसारखेच असणार आहेत. या सिरीजच्या दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये सेल्फीसाठी पंच-होल डिझाईनवाला कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. वीवो V70 सीरीजच्या दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.59 इंच के FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. या आगामी डिव्हाईसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. एलीट मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जन 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
आगामी फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही फोन 50MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह लाँच केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 50MP चा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 50MP चा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. अलीकडेच हे स्मार्टफोन्स EU एनर्जी लेबल वेबसाइटवर V2538 मॉडेल नंबरसह स्पॉट करण्यात आले आहेत. यामध्ये बॅटरी डिटेल्स देखील लीक झाले आहेत. या सिरीजच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6320mAh आणि Elite मॉडेलमध्ये 6500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. दोन्ही फोन्स IP68 रेटेड असणार आहे आणि यामध्ये 55W वायर्ड फास्ट चार्जिंग फीचर देखील असणार आहे.






