• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Role Of Technology Is Crucial In Changing Warfare Says Lieutenant General Dheeraj Seth

बदलत्या युद्धपद्धतीत तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ

परेडचे परीक्षण केल्यानंतर लेफ्टनंट जनरल सेठ यांनी नव्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या चिकाटी, समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले. या यशामागे कुटुंबीयांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे असल्याचे

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 03:29 PM
बदलत्या युद्धपद्धतीत तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ

बदलत्या युद्धपद्धतीत तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, माहितीवरील नियंत्रण आणि बहुआयामी युद्धपद्धतीमुळे भविष्यातील युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, नव्या पिढीतील लष्करी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाबाबत सजग, बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि प्रत्यक्ष मोहिमांसाठी सदैव तयार राहणे आवश्यक असल्याचे मत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी व्यक्त केले.

बिहारमधील गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) येथे आयोजित हिवाळी सत्रातील पासिंग आउट परेडच्या प्रसंगी ते बोलत होते. या समारंभात २८१ छात्रांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश केला. यात ‘एसएससी (टेक) मेन-६४’चे २५३ छात्र आणि ‘एसएससी (टेक) विमेन-३५’च्या २८ महिला छात्रांचा समावेश होता.

परेडचे परीक्षण केल्यानंतर लेफ्टनंट जनरल सेठ यांनी नव्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या चिकाटी, समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले. या यशामागे कुटुंबीयांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आधुनिक युद्धाच्या स्वरूपात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र आणि विद्युत्‌चुंबकीय स्पेक्ट्रम यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे. माहितीवरील प्रभुत्व आणि बहुआयामी रणनितीमुळे भविष्यातील युद्ध अधिक गतिमान आणि अनिश्चित बनत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय लष्कराने वेगवान आणि अचूक प्रतिसाद देत विविध क्षमतांचे प्रभावी एकत्रीकरण करून आपली रणनैतिक ताकद दाखवून दिली, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया ही संस्था भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञानाची जाण असलेले, शिस्तबद्ध आणि राष्ट्रसेवेची भावना जपणारे अधिकारी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

सध्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षेचे वातावरण अधिक गुंतागुंतीचे बनत असताना सशस्त्र दलांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे लेफ्टनंट जनरल सेठ यांनी सांगितले. ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टाकडे देश वाटचाल करत असताना राष्ट्रीय सुरक्षेचे भक्कम आधारस्तंभ म्हणून सशस्त्र दलांचे योगदान निर्णायक राहील, असे त्यांनी नमूद केले.

गणवेशातील नेतृत्वासाठी शौर्याबरोबरच नैतिक धैर्य, आत्मविश्वास, संवेदनशीलता, ठामपणा आणि नम्रता हे गुण आवश्यक असल्याचे सांगत “देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण हे नेहमीच सर्वोच्च असले पाहिजे,” हा लष्करी नेतृत्वाचा मूलमंत्र नव्या अधिकाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Role of technology is crucial in changing warfare says lieutenant general dheeraj seth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • pune news
  • technology

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
2

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

Womens Day 2026 : कॅम्पसपासून समाजापर्यंत…; हर्षदा देशमुख जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या सविस्तर
3

Womens Day 2026 : कॅम्पसपासून समाजापर्यंत…; हर्षदा देशमुख जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या सविस्तर

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड
4

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप

The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप

Mar 09, 2026 | 10:05 AM
Kalashtami 2026: 11 की 12 मार्च कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Kalashtami 2026: 11 की 12 मार्च कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Mar 09, 2026 | 10:00 AM
Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

Mar 09, 2026 | 09:55 AM
Today’s Share Market: इराण-इस्रायल तणावाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,८६२ अंकांनी घसरला 

Today’s Share Market: इराण-इस्रायल तणावाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,८६२ अंकांनी घसरला 

Mar 09, 2026 | 09:54 AM
India vs New Zealand : प्रशिक्षक Gautam Gambhir च्या यशामागे कोण? विश्वचषक जिंकून फेडले ऋण, या दोघांना दिले पूर्ण श्रेय

India vs New Zealand : प्रशिक्षक Gautam Gambhir च्या यशामागे कोण? विश्वचषक जिंकून फेडले ऋण, या दोघांना दिले पूर्ण श्रेय

Mar 09, 2026 | 09:46 AM
Baramati Politics: संसदेतील बारामतीचा नवा ‘पवार’ पॅटर्न; आजोबा अन् नातू एकाचवेळी राज्यसभेवर

Baramati Politics: संसदेतील बारामतीचा नवा ‘पवार’ पॅटर्न; आजोबा अन् नातू एकाचवेळी राज्यसभेवर

Mar 09, 2026 | 09:44 AM
केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

Mar 09, 2026 | 09:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.