Apple Back to School Offer: विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार AirPods आणि Apple Pencil, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट
शाळा सुरू झाली आहे. विद्यार्थी शाळेच्या तयारीत व्यस्त आहेत. शाळेसाठी युनिफॉर्म व पुस्तकांची खरेदी देखील सुरू झाली आहे. आणि आता अशातच एक जॉईंट कंपनी Apple ने त्यांची बहूप्रतीक्षेत ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर म्हणजे बॅक टू स्कूल ऑफर. कंपनीने लाँच केलेल्या 2025 च्या ऑफरमध्ये विद्यार्थ्यांना Airpods आणि Air pencil मोफत मिळणार आहे. पण यासाठी विद्यार्थ्यांना आयपॅड, macbook किंवा iMac ची खरेदी करावी लागणार आहे.
काय सांगता! आता चार लोकं एकत्र करू शकतात डेट, Tinder ने लाँच केलेल Double Date फीचर आहे तरी काय?
या Airpods आणि Air pencil ची किंमत 27 हजाराहून अधिक आहे. त्यामुळे आता तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा असेल तर अशावेळी तुमच्यासाठी संधी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण तुम्हाला एका गॅजेट्सच्या खरेदीवर दुसरं गॅजेट फ्री मिळणार आहे. ही ऑफर 17 जूनपासून सुरू करण्यात आली असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. Apple स्टोअर, Apple ऑनलाइन स्टोअर आणि Apple ॲपद्वारे संधीचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच ग्राहकांना स्टोअर आणि ऑनलाइन अशा दोन्ही ठिकाणी Apple तज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या ऑफर अंगर्गत ग्राहकांना केवळ एक iPad आणि एक Mac वरच प्रमोशनल ऑफरचा लाभ मिळणार आहे. ही ऑफर iPad Mini, iPad 10th Gen, Mac Mini, Mac Pro, Mac Studio आणि रीफर्बिश्ड मॉडल्सवर लागू केली जात नाही. iPad Air आणि iPad Pro ची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Apple Pencil Pro किंवा AirPods 4 फ्री मिळणार आहे. तर MacBook Air किंवा MacBook Pro ची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना AirPods 4 (ANC सह) मिळणार आहे. सर्व डिव्हाईस Apple च्या नवीन Apple Intelligence फीचर्स सह उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होणार आहे. यामध्ये Image Playground, Genmoji आणि Writing Tools सारख्या स्मार्ट टूल्सचा समावेश आहे.