Online Game रिकामंं करू शकतात तुमचं बँक अकाऊंट; कधीही करू नका या चुका
आजच्या काळात लहान मुल रडायला लागलं की त्याला टिव्हीसमोर बसवलं जातं किंवा त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. यानंतर मुलं फोनमध्ये काय करत आहेत, काय बघत आहेत याकडे बहुतेक आईवडील लक्ष देत नाहीत. मात्र यानंतर काही चुकीचं घडलं तर पश्चाताप करण्याची वेळ येते. एवढंच नाही लहान मुलांनी एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं पूर्ण बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.
आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर
अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नादात संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं झालं आहे. ऑनलाईन गेमिंगवेळी आपल्याला अनेक आकर्षक ऑफर्स आणि डिल्स पाहायला मिळतात. या डिल्स आणि ऑफर्स आपलं बँक अकाऊंट रिकामं करू शकतात. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सायबर दोस्तने काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सायबर दोस्तने त्यांच्या अधिकृत हँडल अकाउंटवर मुलांना माहिती दिली आहे की ऑनलाईन गेमिंगमुळे तुमच्या पालकांच्या फोनवरून बँक अकाउंट कसे रिकामं होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑनलाईन गेमिंगवेळी मुलांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, ज्यामुळे बँक अकाऊंट रिकामं होणार नाही आणि स्कॅमर्सपासून आपली सुरक्षा केली जाईल, याबाबतची माहिती सायबर दोस्तने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. ऑनलाईन गेम खेळताना तुम्ही खाली दिलेल्या तिन चुका केल्या तर काही क्षणातच तुमचं अकाऊंट रिकामं होऊ शकतं. कोणत्या 3 चुका करू नयेत आणि जर बँक खात्यात फसवणूक झाली तर अशा परिस्थितीत प्रथम काय करावे ते जाणून घेऊया.
Even 𝐊𝐚𝐳𝐚𝐦𝐚 got tricked!
We should never fall for #unknownlinks in online games.Ohh yeah, That won’t work on you, right? Because you follow @Cyberdost 😎#I4C #CyberSafeSummer #KazamaSays #Shinchan #OnlineGamingFraud #Doreamon #Shizuka #CyberSafetyForKids #Hungama pic.twitter.com/noaNKV97He
— CyberDost I4C (@Cyberdost) May 26, 2025
रिडीम किंवा अन्य बेनिफिट्स – ऑनलाइन गेमिंगवेळी जर 100 रुपयांत रिडीम किंवा अन्य बेनिफिट्स देण्याचा दावा केला जात असेल तर थांबा. या ऑफरवर क्लिक करताच स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकता आणि तुमचं बँक अकाऊंट देखील रिकामं होऊ शकतं.
लिंकवर क्लिक करू नका – जर तुम्हाला तुमच्या फोनवर गेम डाउनलोड करण्याची लिंक आली असेल तर त्यावर क्लिक करू नका. ही लिंक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.
स्कॅमर्सचं जाळं – कोणत्याही अनोळखी नंबरवर क्लिक करू नका. जर तुम्हाला WhatsApp किंवा फोनवर एसएमएस आला तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. हे स्कॅमर्सचं जाळं असू शकते जे तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.
AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत
जर तुम्ही अशी चूक केली आणि तुमचे बँक अकाउंट रिकामे झाले, तर विलंब न करता 1930 वर संपर्क साधा. याशिवाय, ऑनलाइन प्रोसेस फॉलो करून सायबर शाखेत तक्रार नोंदवा.