Tech Tips: स्मार्ट ग्लास खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या हिशोबाने त्याच्या टाईपची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारात ऑडियो ओनली, कॅमेरा-इक्विप्ड स्मार्ट ग्लासेस आणि डिस्प्ले-बेस्ड स्मार्ट ग्लासेस उपलब्ध आहेत. तुम्हाला केवळ गाणी ऐकण्यासाठी आणि कॉल्स इत्यादीसाठी स्मार्ट ग्लासेसची गरज असेल तर तुम्ही ऑडियो ओनली स्मार्ट ग्लासची निवड करू शकतात. जर तुम्ही कंटेट क्रिएटर असाल तर कॅमेरा-इक्विप्ड ग्लासेस तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. तर डिस्प्ले बेस्ड स्मार्ट ग्लासेस तुमच्या मोबाईलसाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्यापूर्वी त्याची डिझाईन आणि फिनिशिंगवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. काही काळापर्यंत स्मार्ट ग्लासेस अत्यंत जड होते, त्यामध्ये मोठी फ्रेम दिली जात होती, ज्यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळत होती. मात्र आता डिझाईनमध्ये बराच बदल करण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट ग्लासेस देखील सामान्य शेड्सप्रमाणे दिसू लागले आहेत. त्यामुळे स्मार्ट ग्लासेस खरेदी करताना डिजाइन आणि फिनिशिंगवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
जर तुम्हाला दिर्घकाळापर्यंत स्मार्ट ग्लासेस घालायचे आहेत तर त्यांचे वजन कमी असलं पाहिजे. 50-55 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे ग्लासेस नाकाला आणि कानाला जड वाटू शकतात. म्हणून, खरेदी करण्यापूर्वी वजनाचा विचार करा.
जर तुम्हाला आधापासूनच चश्मा असेल तर स्मार्ट ग्लासेस प्रिस्क्रिप्शन लेंसेसला सपोर्ट करतात की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच स्थानिक ऑप्टिकल दुकानांमधून या फ्रेम्समध्ये बसवलेले लेन्स मिळवणे महाग असू शकते म्हणून ब्रँडकडून अशा लेन्स दिल्या जात आहेत की नाहीत याची चौकशी करा.
Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं
बॅटरी लाईफबाबत स्मार्ट ग्लासेसमध्ये अद्याप जास्त प्रगती केली नाही. सर्व फीचर्स वापरताना प्रगत मॉडेल्स देखील पूर्ण दिवसाची बॅटरी लाईफ देऊ शकत नाहीत. म्हणून, तुमच्या गरजेनुसार चांगली बॅटरी लाईफ असलेले स्मार्ट ग्लासेस निवडा.
Ans: Smart Glasses हे स्मार्टफोनशी कनेक्ट होणारे स्मार्ट वियरबल डिव्हाइस आहे, ज्यात कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर, AR फीचर्स आणि डिस्प्ले टेक्नोलॉजी असते.
Ans: Bluetooth किंवा Wi-Fi द्वारे फोनशी कनेक्ट होऊन कॉल्स, नोटिफिकेशन्स, म्युझिक, कॅमेरा आणि AR माहिती वापरकर्त्याला दाखवतात.
Ans: होय, परंतु गोपनीयता महत्त्वाची असल्याने कॅमेरा आणि मायक्रोफोनचा जबाबदारीने उपयोग करावा.






