BSNL चा नवा 5G प्लॅन, नावाचीही झाली घोषणा (फोटो सौजन्य - iStock)
5G ची सध्या जमाना आहे आणि अनेक कंपनीज गेल्या काही वर्षांपासून 5G सर्व्हिस पुरवत आहेत आणि आता सरकारी कंपनी असणारी BSNL ने देखील यामध्ये पुढाकार घेत नवे पाऊल टाकायचे ठरवले आहे. बीएसएनएलने आपली ५जी सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने सेवेचे नाव देखील जाहीर केले आहे. आता बीएसएनएलची 5G सेवा Q-5G म्हणून ओळखली जाईल, ज्याचे पूर्ण नाव Quantum 5G आहे.
BSNL ने ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली आणि नाव सुचविण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व वापरकर्त्यांचे आभारदेखील मानले आहेत. X वरील पोस्टमध्ये BSNL ने म्हटले आहे की त्यांनी BSNL Q 5G म्हणजेच Quantum 5G यशस्वीरित्या लाँच केले आहे. कंपनीने म्हटले आहे की हे नाव त्यांच्या 5G सेवेची ताकद, वेग आणि भविष्य प्रतिबिंबित करते आणि म्हणूनच त्यांनी या नावाची निवड केल्याचेही सांगितले आहे.
1 लाख टॉवर लागणार
BSNL ला केंद्र सरकारकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी अलिकडेच माहिती दिली की BSNL देशभरात 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर बसवणार आहे. BSNL च्या 4G सेवा विस्ताराचा हा दुसरा टप्पा असेल. सध्या ही योजना केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
पहिल्या टप्प्यात 1 लाख टॉवर बसवण्यात आले आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर दुसरे 1 लाख टॉवर बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. या टॉवर्सच्या मदतीने, BSNL कनेक्टिव्हिटी लाखो वापरकर्त्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
स्वदेशी तंत्रज्ञानावर जोर
BSNL च्या 5G आणि 4G सेवांचे खास वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये देशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मे 2023 मध्ये BSNL ने दूरसंचार उपकरणांच्या पुरवठ्यासाठी Ericsson कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले होते, मात्र टॉवरचे काम Tata Consultancy Services (TCS) आणि Tejas Networks यांना सोपविण्यात आले होते.
या टॉवर्सच्या देखभालीसाठी सरकारने 13,000 कोटी रुपये गुंतवले आहेत, जे पुढील 10 वर्षांत खर्च केले जातील. आतापर्यंत, बीएसएनएलने सुमारे 1 लाख 4G/5G टॉवर्स बसवले आहेत, त्यापैकी 70,000 हून अधिक टॉवर्स आधीच कार्यान्वित झाले आहेत.
भविष्याकडून आशा
BSNL चा हा नवीन उपक्रम देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या, डिजिटल इंडियाला बळकटी देण्याच्या आणि खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. Q-5G सेवेद्वारे, बीएसएनएल केवळ जलद इंटरनेट प्रदान करणार नाही तर देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मजबूत नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास देखील मदत करेल.