भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) एका नवीन धोरणावर काम करत आहे. आता बीएसएनएलने धोरणात्मक भागीदारी केली आहे. यामध्ये कंपनीने आयपीटीव्ही सर्व्हिस प्रोव्हायडर स्कायप्रोसोबत हातमिळवणी केली आहे. त्याच्या मदतीने, बीएसएनएल ग्राहकांना प्रगत टेलिव्हिजन आणि इंटरनेट एक्सपीरियंस प्रदान केला जाईल. लोकांना डिजिटल एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. आयपीटीव्ही सर्व्हिसच्या मदतीने हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा दिली जाईल.
BSNL ने केली Skypro सोबत हातमिळवणी
भागीदारीनंतर, BSNL ग्राहकांना Skypro ची IPTV सर्व्हिस मिळेल. ही सर्व्हिस तुम्हाला स्मार्ट टीव्हीवरही मिळणार आहे. ही सर्व्हिस 500 HD/SD/लाइव्ह चॅनेल प्रदान करते. याशिवाय, 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश देखील दिला जातो. बीएसएनएल (BSNL) ब्रॉडबँड नेटवर्कवरही काम करत आहे. त्यात व्हॅल्यू-ऍडेड सेवाही उपलब्ध आहेत. याचा अर्थ ते तुमच्यासाठी खूप सकारात्मक असणार आहे.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
चंदिगढपासून झाली सुरुवात
BSNL च्या वतीने, CGM पंजाब सर्कल म्हणाले, ’28 नोव्हेंबर रोजी आमची नवीन इंटरनेट टीव्ही सेवा सीएमडी रॉबर्ट रवी जी यांनी सुरू केली आहे. त्यात आयपीटीव्ही प्लॅटफॉर्मवर प्रवेश देखील देण्यात आला आहे. ही सेवा लोकप्रिय चॅनेलमध्ये प्रवेश देते, ज्यामध्ये कलर्स, झी स्टार आणि स्पोर्ट्स चॅनेलचा समावेश आहे. यासाठी कोणत्याही सेट टॉप बॉक्सची गरज नाही. चाचणीनंतर त्याची चंदीगडमध्ये सुरुवात केली जात आहे. सुरुवातीला त्याचे आठ हजार ग्राहक आहेत. सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची आमची योजना आहे. आम्ही ग्राहकांना नवीन वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश देखील देऊ इच्छितो.
स्कायप्रोचे बिझनेस हेड नितीन सूद म्हणाले, “भारतीयांना खऱ्या अर्थाने आधुनिक आणि तल्लीन करमणुकीचा अनुभव देण्यासाठी BSNL सोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. Skypro मध्ये, आम्ही तुमच्या घरात आरामात थिएटर स्क्रीनची कॉलीटी प्रदान करणारे सोल्युशन तयार करण्याच्या दिशेने काम करत आहोत. ही भागीदारी आमच्यासाठी एक मोठी संधी असणार आहे, ज्यामुळे स्कायप्रोला त्याची पोहोच वाढवता येईल आणि व्यापक प्रेक्षकांपर्यंत अत्याधुनिक मनोरंजन समाधाने पोहचवता येईल. BSNL च्या विस्तृत नेटवर्कशी आमच्या कौशल्याची जोड देऊन, आम्ही भारतात घरगुती मनोरंजनासाठी एक नवीन बेंचमार्क सेट करत आहोत,” असे म्हणाले.
बीएसएनएलचा दावा आहे की, हा भारतातील सर्वाधिक ग्रामीण ब्रॉडबँड प्रवेश आहे. Skypro सर्व BSNL FTTH सदस्यांना 500 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि 20+ OTT ॲप्लिकेशन्स ऑफर करेल. ही सेवा ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रदान केली जाईल आणि यासाठी सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता नाही. ही सर्व्हिस थेट स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध होईल.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
काय आहे Skypro
Skypro बद्दल बोलायचे झाले तर या कंपनीची स्थापना 2019 मध्ये झाली होती. घरातील मनोरंजनाच्या बाबतीत याचा चांगला यूजरबेस आहे. हे पारंपारिक टीव्ही अनुभवाला आव्हान देते आणि सेट-टॉप-बॉक्सशिवाय स्मार्ट टीव्हीवर टीव्ही कंटेंट प्रदान करते. म्हणजेच तुम्ही संपूर्ण प्रक्रिया स्मार्ट पद्धतीने फॉलो करू शकता. आता कंपनीने BSNL सोबत भागीदारी केली आहे जी प्रत्येक बाबतीत सकारात्मक दिसून येत आहे.