Call of Duty Warzone Mobile Game अखेर बंद, कंपनीने केली घोषणा; काय आहे कारण? जाणून घ्या
चिमुकल्यांपासून तरूणांपर्यंत सर्वांमध्ये अनेक बॅटल रॉयल गेम्स लोकप्रिय आहे. या गेम्समध्ये फ्री फायर, कॉल ऑफ ड्यूटी: वॉरझोन, पबजी मोबाईल, सिग्मॅक्स, फ्री फायर अॅडव्हान्स, यांसारख्या अनेक गेम्सचा समावेश आहे. खरं तर लोकांमध्ये या गेम्सची प्रचंड क्रेझ आहे. कारण हे बॅटल रॉयल गेम्स केवळ मनोरंजनाचं नाही तर पैसे कमावण्याचे देखील साधन आहे. गेमर्स लाईव्ह स्ट्रिमिंग करून युट्यूबद्वारे पैसे कमावतात. तुम्ही देखील या गेमर्सपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.
पॉपुलर बॅटल रॉयल गेम Call of Duty: Warzone Mobile कंपनीने अधिकृतपणे बंद केला आहे. अलीकडेच Activision ने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. PUBG Mobile आणि भारतात BGMI या दोन लोकप्रिय गेम्सना टक्कर देण्यासाठी Call of Duty: Warzone Mobile लाँच करण्यात आला होता. मात्र केवळ एका वर्षातच कंपनीला हा गेम बंद करावा लागला आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केल्यामुळे हा Call of Duty Warzone Mobile आता Google Play Store आणि Apple App Store वरून हटविण्यात आला आहे. यामुळे आता युजर्स हा गेम डाऊनलोड करू शकत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Activision ने दिलेल्या माहितीनुसार, Warzone Mobile चा परफॉर्मेंस कंपनीच्या अपेक्षेनुसार नव्हता. तर PC आणि कंसोलवर Call of Duty सीरीजने यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र मोबाईल वर्जनला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. यासोबतच कंपनी आधीपासूनच Call of Duty Mobile चालवत आहे, जो लाखो लोक खेळत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रियता नसलेला गेम सुरु ठेवणं अधिक खर्चीक ठरलं असतं. त्यामुळे कंपनीने अखेर हा गेम बंद करण्याचा निर्णय घेतला.
जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये किंवा आयफोनमध्ये आधीच Warzone Mobile इंस्टॉल केला असेल तर तुम्ही हा गेम खेळू शकता. मात्र हा गेम आता Google Play Store आणि Apple App Store वर डाऊनलोडसाठी उपलब्ध नाही. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या गेममध्ये आता अपडेट, सीजन किंवा कोणताही नवीन कंटेट दिला जाणार नाही. तसेच, गेममधील खरेदी देखील बंद करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही गेममध्ये पैसे गुंतवले असतील तर ते आता वापरले जाऊ शकत नाही. Activision ने हे पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
अॅक्टिव्हिजन म्हणते की जर तुम्ही 15 ऑगस्टपूर्वी तुमच्या अॅक्टिव्हिजन खात्याने कॉल ऑफ ड्यूटी मोबाइलमध्ये लॉग इन केले तर तुम्हाला वॉरझोन मोबाइलमध्ये असलेल्या बॅलन्सच्या दुप्पट मूल्य मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही गेमच्या स्टोरीलाइन आणि गेमप्लेमध्ये फारसा फरक नाही, ज्यामुळे यूजर्ससाठी ट्रांजिशन सोपे होईल.