WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature
WhatsApp युजर्स तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुमचं टायपिंगचं टेंशन लवकरच संपणार आहे. कारण WhatsApp मध्ये एक नवीन फीचर येणार आहे. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा सर्वाधिक वापर चॅटिंगसाठी केला जातो. मित्रांसोबत, प्रेयसीसोबत किंवा कुटूंबियांसोबत आपण WhatsApp वर चॅटिंग करत असतो. कधी कधी इतकी चॅटिंग करतो की आपले हात दुखू लागतात. पण आता तुमचं टायपिंगचं टेंशन लवकरच दूर होणार आहे. कारण WhatsApp लवकरच ग्रुप चॅटिंगसाठी एक खास फीचर घेऊन येणार आहे.
WhatsApp ने त्यांच्या युजर्ससाठी Voice Chat नावाचं एक नवीन फीचर लाँच केलं आहे. टप्प्याटप्प्याने हे फीचर्स सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. WhatsApp युजर्सची ग्रुप चॅटिंग अधिक मजेदार व्हावी यासाठी हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ग्रुप चॅटिंगमध्ये बोलण्यासाठी टाईप करण्याची गरज नाही. पण आता असा प्रश्न आहे की, WhatsApp मध्ये व्हॉईस नोट फीचर तर आधीपासूनच उपलब्ध आहे. मग हे नवीन फीचर कशासाठी? नवीन फीचर आणि व्हॉईस नोटमध्ये काय फरक आहे? (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp चं हे नवीन फीचर खासकरून अशा लोकांसाठी लाँच करण्यात आलं आहे ज्यांना ग्रुपमध्ये मोठे मेसेज टाईप करायचे आहेत. पण त्यांना हे मेसेज टाईप करायला कंटाळा येतो. अशा लोकांसाठी नवीन फीचर अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. आता ग्रुप चॅटमध्ये तुम्ही तुमच्या आवाजात बोलून चॅट करू शकणार आहात, तेही हँड्स-फ्री आणि रीयल-टाइममध्ये. म्हणजेच कॉल केल्याशिवाय केवळ ग्रुपमध्ये तुम्ही लाईव्ह व्हॉईस चॅट सुरु करू शकता. तुम्ही ग्रुपमधील व्यक्तिंसोबत समोर बसून बोलत आहात असा आभास तुम्हाला यावेळी होणार आहे. आधी हे फीचर केवळ मोठ्या ग्रुप्ससाठी सुरु करण्यात आलं होतं. मात्र आता हे फीचर सर्व ग्रुपसाठी उपलब्ध असणार आहे.
हे फीचर हळूहळू सर्व यूजर्ससाठी आणले जात आहे. जर हे अपडेट तुमच्या फोनवर अजून आले नसेल, तर थोडी वाट पहा, लवकरच ते तुमच्या डिव्हाईसवरही उपलब्ध होईल. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल.
युजर्सने लक्षात ठेवा की, व्हॉईस नोट आणि व्हॉईस चॅट हे दोन्ही फीचर्स पूर्णपणे वेगळे आहेत. व्हॉइस नोट्स हे एकतर्फी मेसेजिंग आहे, तर व्हॉइस चॅट फीचर कॉल बटण दाबल्याशिवाय थेट ग्रुप संभाषण सुरू करून लाईव्ह ग्रुप कॉलिंग अनुभव देते. या नवीन वैशिष्ट्यामुळे संभाषणे जलद तर होतीलच पण ती अधिक नैसर्गिक आणि इंटरेक्टिव देखील होतील, असं सांगितलं जात आहे.