iPhone 17 Pro बाबत समोर आली मोठी अपडेट! DSLR सारखा कॅमेरा आणि मिळणार रॉकेटसारखी स्पीड, किंमत वाचून डोळे विस्फारतील
टेक जायंट कंपनी अॅपल त्यांच्या आगामी आयफोन लाँचिंगच्या तयारीत व्यस्त आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज लाँच केली जाणार आहे. आयफोन 17 सिरीज खास असणार आहे कारण त्याचं डिझाईन इतर आयफोनपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. या आयफोनचे फीचर्स देखील आधीपेक्षा अपग्रेड असणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कंपनी त्यांच्या आगामी आयफोन 17 सिरीजसह मोठा धमाका करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोन 17 सिरीजअतर्गंत आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्सचा यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आयफोनच्या या आगामी सिरीजमधील स्मार्टफोनबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे आता युजर्सना आगामी आयफोनबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता आम्ही तुम्हाला आयफोन 17 प्रोच्या लिक्सबाबत सांगणार आहोत.
आयफोन सिरीजमधील प्रो मॉडेल्स सर्वात खास असतात. त्यांचे डिझाईन आणि आकर्षक बॉडी सर्वांनाच त्यांच्या प्रेमात पाडते. आता आगामी सिरीजमधील प्रो मॉडेलबाबत देखील एक अपडेट समोर आली आहे. ज्यामध्ये आगामी सिरीजचं डिझाइन, कॅमेरा आणि किंमतीबाबत काही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वात जास्त चर्चेत असलेला फोन म्हणजे आयफोन 17 प्रो आहे. असं सांगितलं जात आहे, आयफोन 17 प्रो डिझाइन, कॅमेरा आणि कामगिरीच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा अपग्रेड असू शकतो. लाँचिंगपूर्वी, त्याबद्दल अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे.
आयफोन 17 प्रो सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होणार अशी अपेक्षा आहे. हा आयफोन 11 किंवा 13 सप्टेंबर दरम्यान लाँच केला जाऊ शकतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, भारतात त्याची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये असू शकते, तर अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत 2,099 डॉलर आणि दुबईमध्ये AED 4,599 पर्यंत जाऊ शकते. एक्सपर्ट्सने सांगितलं आहे की, हाई-एंड मॉडल्सची किंमत 2,300 डॉलर्सपेक्षा पेक्षा जास्त असू शकते.
यावेळी कंपनी आयफोन 17 प्रो मध्ये टायटॅनियमऐवजी हलकी अॅल्युमिनियम आणि काचेची बॉडी देऊ शकते. मागील कॅमेरा मॉड्यूल देखील बदलेल आणि त्यात आयताकृती बार डिझाइन असू शकते. याचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवीन नावांसह रंग पर्यायांमध्ये काळा, पांढरा, राखाडी आणि सोनेरी रंग दिसू शकतो.
यात तीन 48MP रिअर कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 3.5x ऑप्टिकल आणि 7x लॉसलेस झूमसह नवीन टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा 12MP वरून 24MP पर्यंत वाढवता येईल, ज्यामुळे सेल्फीच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल.
यात 6.3-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED स्क्रीन असेल, जो 120Hz प्रोमोशन तंत्रज्ञानासह येईल. कामगिरीसाठी, याला नवीन A19 Pro चिपसेट, 12GB रॅम आणि 35W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. आयफोन 17 प्रो हा अॅपल चाहत्यांसाठी एक उत्तम अपग्रेड असू शकतो. विशेषतः ज्यांना कॅमेरा, कामगिरी आणि प्रीमियम डिझाइनमध्ये काहीतरी नवीन हवे आहे त्यांच्यासाठी आयफोन 17 प्रो बेस्ट असणार आहे.