Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी
फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी एक नवीन ईव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या ईव्हेंटचं नाव आहे Darkness Ring. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये Eternal Essence रेयर बंडल प्लेअर्सना मिळवण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच Eternal Enigma वेपन स्किन आणि यूनिवर्सल टोकन देखील मिळणार आहे. या सर्व वस्तू खूप कमी किमतीत क्लेम केल्या जाऊ शकतात. फ्री फायर मॅक्स हा भारतातील एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. हा २०२२ मध्ये बंदी घालण्यात आलेल्या फ्री फायर गेमचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. फ्री फायर मॅक्स त्याच्या उत्कृष्ट ग्राफिक्स आणि गेमप्लेसाठी ओळखला जातो. नवीन गेमिंग इव्हेंटबद्दल अधिक जाणून घेऊया.
फ्री फायर मॅक्स डार्कनेस रिंग 4 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. यामध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्स Eternal Essence बंडलसह Eternal Enigma वेपन स्किन मुख्य रिवॉर्ड म्हणून जिंकू शकतात. एवंढचं नाही तर प्लेअर्सना यूनिवर्सल टोकन देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डार्कनेस रिंग एक लक रॉयल इवेंट आहे. यामध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक वेळी स्पिन कराताना डायमंडची संख्या वाढणार आहे.
फ्री फायर मॅक्ससाठी डार्कनेस रिंग इव्हेंट 4 ऑक्टोबरपासून गेमर्ससाठी लाईव्ह झाला आहे. हा गेमिंग इव्हेंट पुढील 13 दिवस सुरू राहील. या काळात, स्पिनिंग करून रिवॉर्ड्स अनलॉक करता येतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री फायर मॅक्समध्ये गेमिंग इव्हेंट्स विशेषतः प्लेयर्ससाठी तयार केले जातात. हे इव्हेंट्स गेमची मजा वाढवतात आणि प्रीमियम आयटम मिळविण्याची भरपूर संधी देतात.