Elon Musk चा AI सर्वत्र घालतोय धुमाकूळ! इंग्रजीसह मराठीलाही सपोर्ट करतोय Grok, फीचर्स पाहून युजर्स होतायेत चकित
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक असलेल्या एलन मस्कच्या AI कंपनी xAI ने अलीकडेच त्यांचा Grok एक स्वतंत्र अॅप म्हणून लाँच केला आहे. हा AI आता सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. Grok ची क्रेझ लोकांमध्ये प्रचंड वाढली आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, कंम्युटर सर्वत्र Grok राज्य करत आहे. काही दिवसांपूर्वीच डिपसिक आणि चॅटजीपीटी यांच्यात वाद सुरु होता. त्यामुळे हा वाद मिटेपर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना हे दोन्ही चॅटबोट्स न वापरण्याचे आवाहन केलं होतं. याच काळात लोकांमध्ये Grok ची क्रेझ वाढली.
Grok AI चॅटबॉट OpenAI च्या ChatGPT आणि Google च्या Gemini शी स्पर्धा करत आहे. Grok AI हा ChatGPT आणि Gemini ला टक्कर देत आहे. Grok AI च्या युजर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. Grok AI चॅटबॉटमध्ये रिसर्च, क्रिएट ईमेज, हाऊ टू, एनालाईज आणि कोड असे पर्याय देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Grok त्यांच्या युजर्ससाठी अनेक भन्नाट फीचर्स ऑफर करते. कोणत्याही विषयावरील माहिती शोधण्यापासून ते अगदी ईमेज तयार करण्यापर्यंत Grok तुमची अनेक कामं अगदी चुटकीसरशी करू शकतो. Grok चं आणखी एक भन्नाट फीचर म्हणजे इथे तुम्ही केवळ इंग्रजीतच नाही तर मराठीमध्ये देखील सर्च करण्यासाठी सक्षम आहात आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची Grok तुम्हाला मराठीमध्येच उत्तरं देणार आहे. तुम्ही Grok ला मराठीमध्ये अगदी कोणत्याही विषयावरील माहिती विचारू शकता.
तुम्ही जेवण करत असाताना तुम्हाला एखादी रेसिपी आठवली नाही तर Grok तुम्हाला ती रेसिपी देखील सांगणार आहे. एवढंच नाही तर Grok तुम्हाला सध्या सुरु असलेल्या घडामोडींबद्दल देखील माहिती देणार आहे. Grok तुम्हाला अंतराळवीर सुनिता विल्यम्सबद्दल देखील माहिती देण्यासाठी सक्षम आहे. तुम्ही Grok सोबत संवाद साधू शकता, त्याला तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता. एवढंच नाही तर AI च्या मदतीने कस्टम ईमेज देखील तयार केल्या जाऊ शकतात.
तुम्ही एखादा प्रोजेक्ट तायर करत असाल आणि त्यासंबंधित ईमेज तुम्हाला गुगलवर शोधण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही त्या ईमेज Grok कडे मागू शकता. शिवाय, युजर्स रिअल-टाइम माहितीसाठी वेब आणि X वर शोधू शकतात. Grok तुमच्यासाठी कोणत्याही विषयावरील अॅप निबंध आणि ईमेल तयार करू शकते. अॅपची बहुतेक वैशिष्ट्ये लॉग इन न करता वापरली जाऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला Grok चा वापर करायचा असेल तर त्यासाठी लॉगिन करण्याची गरज नाही. एकूणच काय तर इतर चॅटबोटसोबत तुलना करता Grok चे युजर्स दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.