सरकारने नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग तयार केला या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी सरकारने बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला पण त्यानंतर याच समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना नांदेड या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू झाले. नांदेड जालना महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना निकष बदलण्यात आले बाजारभावाच्या पाचपट जमिनीचा मोबदला देण्याऐवजी रेडीने कलरच्या पाचपट देण्याचा निर्णय झाला आणि त्यामुळेच परभणीच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी फक्त दीड लाख रुपयापर्यंत सहज मोबदला मिळत आहे. सेलू तालुक्यातील साडेसहाशे एकर 400 शेतकऱ्यांची जमीन केवळ 65 कोटी मध्येच घेण्याचा डाव सरकारचा असल्याचे समोर आले आहे. आणि त्यामुळेच आता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी या नांदेड जालना समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास आपला विरोध दर्शविला आहे. मागील 38 दिवसापासून हे शेतकरी सेलूच्या उपविभागीय कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करत आहेत. आमच्या जमिनीला योग्य मोबदला द्या तरच आम्ही आमच्या जमिनीत देऊ असा पवित्र आता या शेतकऱ्यांनी घेतला आहे. जबरदस्ती करून आमच्या जमिनी बाळकावण्याचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा देखील यावेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे.