बांगलादेशने श्रीलंकेवर मिळवला विजय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप २०२५ च्या पहिल्या सुपर फोर सामन्यात श्रीलंकेकडून मिळालेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली, परंतु संघातील खेळाडूंनी विजयाचा मार्ग आपल्या खेळाने खेचून आणला. सैफ हसनने अर्धशतक झळकावले. इतकंच नाही तर बांगलादेशच्या प्रत्येक खेळाडूने या सामन्यात चांगली खेळी खेळली आणि म्हणूनच बांगलादेश ही मॅच खेचून आणत विजय मिळवला.
यापूर्वी, आशिया कप सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात, माजी कर्णधार दासुन शनाकाच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेने बांगलादेशला १६९ धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने जलद सुरुवात केली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या. निसांका १५ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर कुसल मेंडिस २५ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेने नियमित अंतराने विकेट गमावल्या.
श्रीलंकेची खेळी
सतत पडणाऱ्या विकेटमध्ये, माजी कर्णधार दासुन शनाकाने शानदार अर्धशतक झळकावले, त्याने ३७ चेंडूत ६४ धावा केल्या, ज्यामध्ये सहा षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. शनाकाच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या. कर्णधार चारिथ असलंकाने १२ चेंडूत २१ आणि कुसल परेराने १६ चेंडूत १६ धावा केल्या.
श्रीलंकेने २०२२ मध्ये आशिया कप जिंकला. टी२० स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या त्या हंगामात दासुन शनाका संघाचा कर्णधार होता. शनाकाच्या अष्टपैलू क्षमतेमुळे त्याला यावेळी संघात स्थान मिळाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने फलंदाजीने आपले कौशल्य सिद्ध केले. संघाला विजय मिळवून देण्यासाठी श्रीलंका आता चेंडूनेही कामगिरी करण्याची अपेक्षा केली होती. मात्र असे अजिबात घडले नाही.
बांगलादेशाची खेळी
बांगलादेशची सुरूवात अत्यंत खराब झाली मात्र हसन, दास आणि हृदोयने ही मॅच श्रीलंकेच्या दाढेतून अक्षरशः खेचून आणली असंच म्हणावं लागेल. बांगलादेशाला गरज असताना हृदोयने अर्धशतक केले. बांगलादेशच्या बॉलर्सने कमालीची कामगिरी करत १६८ धावांवर श्रीलंकेला रोखले आणि नंतर बॅटर्सने कमाल खेळीने ही मॅच जिंकली. हृदोय या सामन्याचा शिल्पकार ठरला.
SL vs BAN: कुसल मेंडिसने रचला इतिहास, ‘या’ गोष्टीत ठरला नंबर 1, कुसल परेराचा तोडला रेकॉर्ड
कसे आहेत दोन्ही संघ
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिश्रा, कुसल परेरा, चारिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्स, दुष्मंथा चमीरा, नुवान थुशारा
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन: सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक/कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, झाकेर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान